सिलेंडरच्या दराबाबत अभिजीत बिचुकले यांचे सरकारला साकडं, मागणीने वेधले लक्ष

Abhijeet Bichukale | गॅस सिलेंडच्या किंमतींचा भडका उडाला आहे. पाच वर्षांत तर या किंमतींनी एक हजारांचा टप्पा पण ओलांडला होता. त्यात काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने दोनशे रुपयांनी कपात करत दिलासा दिला. आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी सिलेंडरच्या किंमतींबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. काय आहे त्यांची मागणी?

सिलेंडरच्या दराबाबत अभिजीत बिचुकले यांचे सरकारला साकडं, मागणीने वेधले लक्ष
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 11:27 AM

सातारा | 12 नोव्हेंबर 2023 : पेट्रोल-डिझेलसह गॅस दरवाढीने भारतीय जनता गेल्या काही वर्षांपासून मेटाकुटीला आली आहे. त्याविषयी जनतेने वारंवार रोष व्यक्त केला. पेट्रोल-डिझेलच्या किंमती मे 2022 पासून जैसे थे आहेत. तर गॅस सिलेंडरच्या किंमतींनी हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने त्यात कपात केली. त्यामुळे सिलेंडर एक हजारांच्या घरात आले आहेत. तरीही जनतेला त्याची झळ बसत आहेच. मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील जनतेला मात्र ही झळ बसत नाही. हाच धागा पकडून आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी पण सिलेंडरच्या किंमतींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले आहे. काय आहे त्यांची मागणी?

500 रुपयांत सिलेंडर द्या

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आणि दिवाळीचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला 500 रुपयांत सिलेंडर उपलब्ध करावा अशी मागणी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी पत्राद्वारे केली. भाजपशासित काही राज्यात सिलेंडर 500 रुपयांत मिळत असताना महाराष्ट्रातही याच दरात सिलेंडर मिळावे अशी त्यांनी मागणी केली.  त्यांच्या या मागणीने राज्याचे लक्ष वेधले आहे.

हे सुद्धा वाचा

दिवाळीची जनतेला भेट

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणातून चर्चेत असतात. सध्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सिलेंडरच्या किंमतींविषयी पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेत आलं तर 500 रुपयात सिलेंडर देण्याचे आश्वासन दिल्याचा दाखला दिला. 2014 पासून महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याचा विचार करावा. 17 नोव्हेंबर रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील जनतेला 500 रुपयात सिलेंडर उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पण सत्तेत सहभागी झाले आहेत. ते आता किती क्लीन आहेत, हे सरकारने दाखवून दिले. त्यामुळे अजित पवार यांनी देखील यामध्ये लक्ष घालून 500 रुपयात सिलेंडर महाराष्ट्रातील जनतेला उपलब्ध करावे, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.