Satara Crime : साताऱ्यात 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा नराधम अखेर जेरबंद

बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी आरोपीने शक्कल लढवत आधीच्या दरोड्याच्या गुन्ह्यात शाहूपुरी पोलिसांत स्वतःहून हजर झाला. त्याला न्यायालयीन कोठडीही मिळाली होती. सातारा तालुका पोलिसांनी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपीस अटक करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Satara Crime : साताऱ्यात 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा नराधम अखेर जेरबंद
साताऱ्यात 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा नराधम अखेर जेरबंद
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 9:45 PM

सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून फिरस्त कुटुंबातील 4 वर्षीय मुलीचे पहाटेच्या सुमारास अपहरण (Kidnapped) करून लैंगिक अत्याचार (Sexually Abusing) करणारा नराधम सातारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. संकेत गुजर (26) असे सदर आरोपीचे नाव असून तो तामजाई नगर येथील रहिवासी आहे. याआधी त्याच्यावर सातारा तालुका हद्दीत चोरी आणि जबरी चोरीचे वेगवेगळे 17 गुन्हे दाखल आहेत. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सातारा तालुका पोलिस करत आहेत. (Accused of sexually abusing 4-year-old girl arrested in Satara)

आधीच्या गुन्ह्यात स्वतःहून पोलिसात हजर झाला आरोपी

चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल् नंतर सातारा शहरासह संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र पोलिसांच्या हाती यश येत नव्हते. दरम्यानच्या काळात आरोपी मिळत नसल्याने त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हे व्हायरल फुटेज आरोपीच्या वडिलांनी आणि भावाने ओळखून शहर पोलिसांशी संपर्क साधत संबंधित युवक हा माझा मुलगा असल्याचे पोलिसांना सांगितले.

या दरम्यानच बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी आरोपीने शक्कल लढवत आधीच्या दरोड्याच्या गुन्ह्यात शाहूपुरी पोलिसांत स्वतःहून हजर झाला. त्याला न्यायालयीन कोठडीही मिळाली होती. सातारा तालुका पोलिसांनी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपीस अटक करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

गोंदियाच्या एव्हरग्रीन हॉटेलमध्ये तरुणीवर बलात्कार

गोंदिया शहरातील फुलचुर रोडवरील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये आमगाव येथील 23 वर्षीय तरुणाने 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी सुद्धा या हॉटेलमध्ये गेल्या महिन्यात एका प्रेमी युगालाने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. (Accused of sexually abusing 4-year-old girl arrested in Satara)

इतर बातम्या

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलाची लैंगिक अत्याचार करुन हत्या, कोथरुडमध्ये 21 वर्षीय तरुणाला अटक

Jalgaon Accident : एसटी संपामुळे विद्यार्थीनीचा हकनाक बळी; ओव्हरलोड रिक्षातून दोघी पडल्या; डोक्याच्या चिंधड्या उडून एकीचा मृत्यू

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....