Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी ताटकळत ठेवलं नाही’, उदयनराजे भोसले यांच्याकडून अखेर स्पष्टीकरण

खासदार उदयनराजे भोसले आज दिल्लीतून साताऱ्यात परतले आहेत. उदयनराजे दिल्लीतून पक्षश्रेष्ठींकडून आपल्या लोकसभा उमेदवारीचं तिकीट पक्क करुनच परतले आहेत. सातारा लोकसभेचं तिकीट आपल्यालाच मिळेल, अशी उदयनराजे यांना खात्री आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून आज उदयनराजेंचं साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी उदयनराजेंना अमित शाह यांच्या भेटीसाठी तीन दिवस ताटकळत का राहावं लागलं? या प्रश्नाचं उत्तर उदयनराजे यांनी स्वत: दिलं.

'मला दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी ताटकळत ठेवलं नाही', उदयनराजे भोसले यांच्याकडून अखेर स्पष्टीकरण
खासदार उदयनराजे भोसलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 5:42 PM

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावा केला जात होता. त्यामुळे उदयनराजे भोसले हे भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. उदयनराजे यांना दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यायची होती. त्यासाठी त्यांना तीन दिवस ताटकळत राहावं लागलं, अशी चर्चा सुरु होती. अखेर या चर्चांवर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिलीय. उदयनराजे भोसले यांची दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी बैठक पार पडली. ही बैठक सकारात्मक ठरली. त्यांना साताऱ्यातून लोकसभेच्या जागेवर उमेदवारी मिळाल्याचं जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे उदयनराजे आज दिल्लीहून साताऱ्यात आले तेव्हा त्यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य केलं.

“माझे याअगोदरही दिल्लीत दौरे चालूच होते. मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं. नेहमी बातम्या येत होत्या की, ताटकळत ठेवलं. पण असं काही नाही. आज केवळ आपल्या सातारा आणि महाराष्ट्राची निवडणूक नाही. संपूर्ण देशभरात निवडणूक सुरु आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील प्रत्येक टप्पातील निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या पक्षांमध्ये तेढ निर्माण झाले होते. महायुतीत तेढ निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम आता झालेलं आहे”, असं उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं.

पक्षश्रेष्ठींनी उदयनराजेंना काय शब्द दिला?

पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला काय शब्द दिला? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उदयनराजेंनी भूमिका मांडली. “पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचं ते सांगितलं आहे. पक्षश्रेष्ठी म्हणजे माझे मित्रमंडळी आणि सहकारी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या इतर पक्षांच्या सहकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यामुळे त्याबाबत शंका घ्यायचं काही कारण नाही”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

‘कुणालाही इशारा नाही’

“एक लक्षात घ्या, कार्यकर्त्यांकडून आज जे जंगी स्वागत होतोय, हा इशारा कुणालाही नाहीय. उमेदवारांची यादी कदाचित आज जाहीर होईल. ती एक प्रक्रिया आहे. यादी जाहीर होईल. सगळं निश्चित झालेलं आहे. निवडणूक मी लढवणारच आहे. कधीतरी सातारला यायचंच होतं. आज मुहूर्त निघाला. आज आलो”, असंही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केलं.

“साताऱ्यात माझ्या स्वागतासाठी इतके लोकं इथे आले आहेत हे बघून खरोखर काय बोलावं ते मला सूचत नाहीय. मी कालही जनतेचा होता, आजही आहे, भविष्य काळात जे जे म्हणून माझ्याकडून लोकांच्या हिताचे कामे असतील ते सोडण्याचं काम मी निश्चितपणे करणार. जनतेचे आभार जेवढे मानावे तेवढे कमीच आहेत”, अशी भावना उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.

'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.