अंध पित्याची मुलाला वाचवण्यासाठी नदीत उडी, मात्र अनर्थ घडलाच; दोघांना कृष्णेत जलसमाधी
कोडोली जवळच्या कृष्णाधाम परिसरातील कृष्णा नदीमध्ये (Krishna river) बाप, लेक बुडाल्याची घटना घडली आहे. अंकुश साळुंखे राहणार चंदनगर असे पित्याचे नाव असून, प्रीतम साळुंखे आसे या मुलाचे नाव आहे.
सातारा : जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोडोली जवळच्या कृष्णाधाम परिसरातील कृष्णा नदीमध्ये (Krishna river) बाप, लेक बुडाल्याची घटना घडली आहे. अंकुश साळुंखे राहणार चंदनगर असे पित्याचे नाव असून, प्रीतम साळुंखे आसे या मुलाचे नाव आहे. मुलगा आणि वडील संगम माहुली (Sangam Mahuli) येथील कृष्णाधाम परिसरात कपडे धुण्यासाठी आले होते. याचदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. अंकुश साळुंखे यांना दोन मुले आहेत. वडील आणि मुले कृष्णाधाम परिसरात कपडे धुण्यासाठी आले होते. मात्र याचदरम्यान अंकुश साळुंखे यांच्या दोनही मुलांना पोहण्याचा मोह झाला. ते पोहण्यासाठी नदीत उतरले. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने मुले नदीत बुडू लागले. अंकुश साळुंखे हे अंध आहेत. परंतु घटना लक्षात येताच त्यांनी देखील नदीत उडी मारली. त्यांना एका मुलाला वाचवण्यात यश आले, मात्र दुसऱ्या मुलांना वाचवताना ते देखील बुडाले.
एका मुलाला वाचवण्यात यश
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश साळुंखे यांना दोन मुले आहेत. अंकुश साळुंखे हे आपल्या दोन मुलांसोबत कृष्णाधाम परिसरात कपडे धुण्यासाठी आले होते. मात्र याचदरम्यान अंकुश साळुंखे यांच्या दोनही मुलांना पोहण्याचा मोह झाला. ते पोहण्यासाठी नदीत उतरले. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने मुले नदीत बुडू लागले. अंकुश साळुंखे हे अंध आहेत. घटना लक्षात येताच साळुंखे यांनी आपल्या मुलांना वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली, एखा मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले. मात्र दुसरा मुलगा प्रीतम साळुंखे याला वाचवताना ते दोघेही पाण्यात बुडाले.
शोधमोहिलेला सुरुवात
दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीने शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत, शोधमोहीम सुरू केली आहे. या ट्रेकर्स ग्रुपकडून बुडालेल पिता पुत्रांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या
कदम रुग्णालयाविरोधात गैरकारभार, अनियमिततेची आरोग्य विभागाची तक्रार, डॉक्टरांविरोधात गुन्हे
Aurangabad: वैजापुरात भरदिवसा दोन लाखांची रोकड लंपास, महावितरणच्या वाहनावर चोरट्यांचा डल्ला!
लिफ्ट देण्याचा बहाणा! ट्रकमध्ये बसवून आळीपाळीनं बलात्कार, नंतर प्रेत नदीत फेकलं