गौतमी पाटील हिने घेतली छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट, दिलं ‘हे’ खास गिफ्ट

डान्सर गौतमी पाटील हिने आज अचानक साताऱ्यात जावून खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. विशेष म्हणजे गौतमीवर बार्शीत गुन्हा दाखल झाल्याची माहिती आज समोर आली होती. त्यानंतर आज तिने छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

गौतमी पाटील हिने घेतली छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट, दिलं 'हे' खास गिफ्ट
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 8:50 PM

सातारा : प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिने आज साताऱ्यात छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. गौतमी पाटील ही गेल्या तीन महिन्यांमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असते. गौतमी पाटील हिची वाढती क्रेझ अनेकांच्या पोटदुखी देखील ठरलीय. त्यामुळे तिचे कार्यक्रम बंद व्हावेत, यासाठी मध्यंतरी एक दुष्कृत्य देखील घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिचा कपडे बदलत असतानाचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. पण तिच्या चाहत्यांनी तिला दिलेला पाठिंबा आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे ती खचली नाही. ती पुन्हा जोमाने कामाला लागली.

गौतमीच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी, या गर्दीत होणारे राडे आणि पोलिसांवर वाढणारा ताण पाहता अनेकांकडून तिच्या कार्यक्रमाला बंदी घालण्याची मागणी होतेय. तर दुसरीकडे बार्शीत तिच्या विरोधात फसवणुकीचा आरोप आयोजकांकडून करण्यात आलाय. या आरोपांप्रकरणी बार्शीत गौतमीच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. या सगळ्या घडामोडींदरम्यान आज गौतमीने अचानक उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. गौतमीने खासदार उदयनराजे यांच्या भेटीत राजेंना भेटवस्तू देखील दिल्याची माहिती समोर आलीय.

‘उदयनराजेंना कलाकारांची खूप जाण’

“छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर खूप छान वाटलं. महाराजांची आज भेट होईल, असं मला सकाळी खरं वाटलं नव्हतं. पण अखेर खरंच भेट झाली. महाराजांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांना भेटून खूप छान वाटलं. त्यांना कलाकारांची खूप जाण आहे, म्हणून मला अभिमान वाटतो”, असं गौतमी पाटील म्हणाली.

हे सुद्धा वाचा

‘सातारकर माझे फेव्हरेट’

“सातारकर माझे फेव्हरेट आहेत. माझे सातत्याने इथे कार्यक्रम असतात. मला भरभरुन प्रेम देतात म्हणून खूप छान वाटतं. असंच भरभरुन प्रेम मला देत राहा”, असं गौतमी म्हणाली. तसेच “मी आज पहिल्यांदाच महाराजांना भेटले. त्यांचा खूप चांगला स्वभाव आहे. त्यांना कलाकारांची जाण आहे. त्यांची आज अचानक भेट झाली. उदयनराजेंचा आशीर्वाद सोबत घेण्यासाठी आज सदीच्छा भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा, अशी मी विनंती करते”, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली.

उदयनराजेंना नेमकं काय गिफ्ट दिलं?

पत्रकारांनी गौतमीला उदयनराजेंना भेटवस्तू काय दिली? असा प्रश्न विचारला तेव्हा गौतमीने या विषयी सविस्तर माहिती दिली. “मी महाराजांना बुके दिलं. तसेच मला माहिती मिळाली होती की, महाराजांना परफ्यूम खूप आवडतो. त्यामुळे मी आताच येता-येता परफ्यूम घेतला. आम्ही महाराजांना परफ्यूम गिफ्ट केलं”, अशी माहिती गौतमी पाटीलने दिली.

यावेळी गौतमी आणि उदयनराजे हे दोन्ही महाराष्ट्राचे आवडते व्यक्तीमत्व आहेत. त्यांना भेटून कसं वाटलं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गौतमीने “उदयनराजे खूप मोठे आहेत. त्यांच्यासोबत माझं नाव घेऊ नका. मी खूप लहान कलाकार आहे. मी एक कलाकार आहेत. ते आपले दैवत आहेत. त्यांना भेटून छान वाटलं”, अशी प्रतिक्रिया दिली.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.