Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना थेट बारामतीमधून आर्शिवाद, भर कार्यक्रमात आली ‘ती’ चिठ्ठी!

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याचं उघडपणे विरोधी पक्षातील नेतेही बोलत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चालू सभेमध्ये बारामतीवरून आलेली चिठ्ठी चर्चेचा विषय ठरत आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना थेट बारामतीमधून आर्शिवाद, भर कार्यक्रमात आली 'ती' चिठ्ठी!
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 9:46 PM

मुंबई : राज्यातील राजकारणात सर्व पक्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फिल्डिंग लावताना दिसत आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष सुरु असताना राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य सुरू झाल्याचं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकारी पक्षध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याचं उघडपणे विरोधी पक्षातील नेतेही बोलत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चालू सभेमध्ये बारामतीवरून आलेली चिठ्ठी चर्चेचा विषय ठरत आहे.

काय आहे नेमकं बारामतीच्या चिठ्ठीत?

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात पोलीस स्थानकाच्या भूमीपूजन सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीस भाषण करण्यापूर्वी त्यांना पोलीस अधिक्षांनी एक चिठ्ठी दिली. त्या चिट्ठीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचे आभार मानण्यात आले होते. वारकऱ्यांसाठी विमा योजना जाहीर केल्याबद्दल वारकऱ्यांच्या वतीने सरकारचे मानले होते. ह.भ.प.इंद्रसेन आठवले यांनी ही चिट्ठी लिहीली होती. तर या चिट्ठीचं वाचन करताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ही चिट्ठी बारामतीहून आली असल्याचं सांगितलं. त्यावेळी थेट बारामतीहून आर्शिवाद आला आहे असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आषाढी वारी उत्सवाच्या पार्श्वभूमीवरसर्व वारकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने विमा कवच देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासोबतच शिंदे-फडणवीस सरकारने वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना आणणार असल्याचीही घोषणा केली. या निर्णयाचे अनेक वारकऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं आहे.

पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज

आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यामुळे सरकारची काहीशी कोंडी झाली होती. विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली. त्यानंतर वारकरी वर्गामध्ये सरकारविषयी काहीसा रोष निर्माण झाल्याची चर्चाही रंगू लागली. त्यानंतर सरकारने आता विमा सुरक्षा योजना जाहीर करत वारकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतला.

Non Stop LIVE Update
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर अजित पवार यांचा सुजय विखेंना फोन
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर अजित पवार यांचा सुजय विखेंना फोन.
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?.
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?.
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल.
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात.
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.