डोंगराला भेगा पडून काही भाग खचला, मोरेवाडी गावात भीतीचे वातावरण

23 कुटुंबांना शेल्टरमध्ये हलवण्यात आलंय. ही शेल्टर्स मोरेवाडी गावाजवळच बनवण्यात आली आहेत.

डोंगराला भेगा पडून काही भाग खचला, मोरेवाडी गावात भीतीचे वातावरण
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 11:14 PM

सातारा : सातारा जिल्ह्यातील पश्चिम‌ भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं दरडी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. या पावसानं सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडल्या. काही भाग खचला असल्याचं निदर्शनास आलंय. यामुळं याठिकाणच्या लोकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. प्रशासन या ठिकाणी पोहोचून लोकांना शेल्टरमध्ये राहण्याची विनंती करतायेत. 23 कुटुंबांना शेल्टरमध्ये हलवण्यात आलंय. ही शेल्टर्स मोरेवाडी गावाजवळच बनवण्यात आली आहेत. या ठिकाणी ही कुटुंब सध्या राहात आहेत.

गावात भीतीचे वातावरण

सातारा तालुक्यातील पश्चिमेच्या बाजूस तारळी धरणाच्या अगदी जवळ असणाऱ्या मोरेवाडी गावात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. गावाच्या लगत असणाऱ्या डोंगरालाच मोठ्याला भेगा पडल्यात. गावावर हा डोंगर काळ बनून उभा असल्याचं पाहायला मिळतंय. डोंगराला भेगा पडल्यामुळं या ठिकाणचे भले मोठे दगड देखील अनेक फूट पुढे सरकलेत. नेहमी या ठिकाणी येणाऱ्या लोकांनी हे पाहिले. त्यानंतर गावात भीतीचं वातावरण पसरलंय.

23 कुटुंब सुरक्षित स्थळी हलवले

मोरेवाडी गावातील 23 कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत.शेल्टरमध्ये या लोकांना हलवलं असलं तरी प्रत्येक पावसाळ्यात मृत्यू आमच्या डोक्यावर काळ बनून बसलेला असतो. असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं. इर्शाळवाडीसारख्या दुर्घटनेला सामोरं जाण्याआधी आमचं कायमचं पूनर्वसन करा, असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

41 गावं दरड प्रवण क्षेत्रात

सातारा जिल्ह्यात सुमारे 41 गावं दरड प्रवण क्षेत्रात येतात. त्यातीलच मोरेवाडी हे गाव आहे. इर्शाळवाडी घटनेनंतर सातारा प्रशासन अलर्ट झालंय. मोरेवाडीतील ग्रामस्थ भयभित आहेत. मात्र या ग्रामस्थांच कायमस्वरुपी पुनर्वसन कधी होणार ग्रामस्थांच्या मागणीला प्रशासन कधी साद देणार हे पाहाणं‌ महत्वाचं‌ असणार आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.