AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Accident : देवदर्शनाला चाललेली ओमनी कार झाडावर आदळली, चार ठार तर पाच जखमी

बाळूमामाच्या मेंढराच्या देवस्थानी आठ जण दर्शनासाठी चालले होते. मात्र देवदर्शनाला पोहचण्याआधीच काळाने भाविकांवर घाला घातला.

Satara Accident : देवदर्शनाला चाललेली ओमनी कार झाडावर आदळली, चार ठार तर पाच जखमी
देवदर्शनाला जाताना कारला अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 10:18 AM

सातारा / 10 ऑगस्ट 2023 : देवदर्शनाला चाललेली ओमनी कार झाडावर आदळून चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी वडूज आणि सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील पेट्रोल पंपानजीक सूर्याचीवाडी हद्दीत ही घटना घडली. बाळू मामाच्या मेंढराचे एक देवस्थान लाकरेवाडी येथे आहे. तेथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातातील मृत आणि जखमी हे बनपुरी, सिधेश्वर कुरोली येथील रहिवासी असल्याचे समजते. तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

देवदर्शनासाठी जात असताना घडला अपघात

खटाव तालुक्यातील बनपुरी आणि सिध्देश्वर कुरोली येथील एकूण आठ जण देवदर्शनासाठी निघाले होते. दहीवडी-मायणी रस्त्यावरील सुर्याचीवाडी येथे पहाटे सहा वाजता ओमनी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात एक पुरुष आणि दोन महिला जागीच ठार झाल्या. तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती वडूज पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी हलवले. अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून हलवले असून, वडूज पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.