Satara Crime : सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी 5 जणांची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणांनी टोकाचे पाऊल का उचलले ? वाचा सविस्तर

सातारा जिल्ह्यात विविध भागात एकाच दिवशी पाच जणांनी गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. आत्महत्येमध्ये कौटुंबिक वाद आणि आजारपण अशी कारणे समोर आली आहेत.

Satara Crime : सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी 5 जणांची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणांनी टोकाचे पाऊल का उचलले ? वाचा सविस्तर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 4:31 PM

सातारा : विविध कारणावरुन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी 5 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या(Suicide) केल्याची धक्कादायक घटना आज साताऱ्यात उघडकीस आली आहे. गणपत कणसे (35 राहणार विहे, पाटण), सुमित गायकवाड (28 राहणार वडगाव हवेली, कराड), अमोल पाटील (37 राहणार सुपने, कराड), अक्षय इंगवले (27 राहणार किडगाव, सातारा), पोपट ढेडे (40 वाई, भुईंज) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. या आत्महत्येप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यां(Local Police Station)मध्ये नोंद करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात विविध भागात एकाच दिवशी पाच जणांनी गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. आत्महत्येमध्ये कौटुंबिक वाद आणि आजारपण अशी कारणे समोर आली आहेत. (In Satara district, 5 people committed suicide by strangulation on the same day)

कुठे घडल्या आत्महत्येच्या घटना?

वाई तालुक्यातील भुईंज येथील पोपट जनार्दन ढेडे यांनी वाईतील एमएसीबीच्या पाठिमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सुरेश श्रीरंग चिकणे यांनी बॉईज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कराड तालुक्यातील वडगाव हवेलीत सुमित सुरेश गायकवाड या युवकाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत सुरेश गायकवाड यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिसरी घटना कराड तालुक्यातील सुपने येथे घडली असून अमोल निवासराव पाटील राहणार सुपने यांनी एका जनावराच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

चौथी घटना पाटण तालुक्यातील विहे येथील असून गणपत जगन्नाथ कणसे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शारदा शिंदे यांनी कराड तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर पाचवी घटना सातारा तालुक्यातील केडगाव येथे घडली असून अक्षय हिंदूराव इंगवले या युवकाने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. अक्षय हा पायाने अपंग असून नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.

लातूरमध्येही मायलेकिंची गळफास घेऊन आत्महत्या

अज्ञात कारणावरुन मायलेकिंनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे घडली आहे. दोन मुलींसह संगीता चव्हाण ही महिला शेतावर गेली होती. यापैकी एक मुलगी घरी परतली. मात्र दुसरी मुलगी आणि आई घरी परतल्याच नाहीत. यामुळे नातेवाईकांनी दोघींची शोधाशोध सुरु केली. यावेळी नागलगाव शिवारात दोघी मायलेकी झाडाला लटकलेल्या दिसल्या. या दोघींना आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. (In Satara district, 5 people committed suicide by strangulation on the same day)

इतर बातम्या

Gondia Crime | विदर्भात घरफोडी करून घातला होता धुमाकुळ; पोलिसांनी टोळीला कसे केले जेरबंद?

Solapur : सोलापूरमधील ‘त्या’ मायलेकींची आत्महत्या हुंड्यासाठीच; पती आणि सासऱ्यासह तिघांना अटक, दहा जणांवर गुन्हा दाखल

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.