सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये संकट घोंघावतंय? कोयना धरणाच्या कॅनलमधून पाण्याची गळती, लाखो लीटर पाणी वाया

कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे. या धरणातून वीज निर्मितीसाठी घेऊन जाणाऱ्या कॅनलला गळती लागल्याची बातमी समोर आलीय.

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये संकट घोंघावतंय? कोयना धरणाच्या कॅनलमधून पाण्याची गळती, लाखो लीटर पाणी वाया
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 8:26 PM

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरण ओळखले जाते. याच कोयना धरणावर संपूर्ण महाराष्ट्रातील वीजनिर्मिती केली जाते. मात्र धरणाचे पाणी ज्या ठिकाणावरुन वीज निर्मितीला आणले जाते त्या ठिकाणीच गळती लागल्याने खळबळ उडालीय. या गळतीतून आतापर्यंत लाखो लीटर पाणी वाया गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे. ते सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये कोयना नदीवर बांधण्यात आलंय. हे धरण देशातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. पण या धरणाच्या कॅनलला गळती लागल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. या धरणातून वीज निर्मितीसाठी घेऊन जाणाऱ्या कॅनलला गळती लागल्याची बातमी समोर आलीय. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलंय.

कोयना धरणाच्या कॅनलमधून गळती होत असल्याची बातमी समोर आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलंय. कोयना धरणातील गळतीमुळे कोकणातील तिवरे धरणफुटीची जशी घटना घडली होती, अगदी तशीच घटना घडणार नाही ना? अशा उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. या चर्चांवर जलसंपदा विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

“तडे गेले तरी धरणाला धोका नाही”, असं जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये कोयना धरण आहे. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण धरण परिसरात आहे. हे धरण महाबळेश्वर येथे आहे. त्यामुळे लाखो पर्यंटक या परिसरात येत असतात. पण या पर्यटनस्थळी काही अनपेक्षित घटना घडू नये, असं प्रत्येक नागरिकाचं मत आहे.

सह्याद्रीच्या अवाढव्य डोंगरांकडे पाहिल्यानंतर आपल्या स्फुर्ती मिळते. पण त्या डोंगररांगामध्ये कोणत्याही संकटाचा जन्म होऊ नये, अशी आशा आहे. अर्थात हे सर्व आपल्या हातात नाही. पण संकट असेल तर ते दूर सारण्याची जबाबदारी प्रशासनावर नक्कीच आहे. प्रशासन आता कोयना धरणाच्या कॅनलला लागलेल्या गळतीवर नेमकं काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

पाहा गळती कशी झालीय त्याचा व्हिडीओ :

जलसंपदा विभागाची नेमकी भूमिका काय?

गळतीमुळे धरणाला, वीजगृहाला किंवा डोंगराला धोका नाही. गळती थांबवण्यासाठी उपययोजना प्रस्तावीत आहे. कोयना अवजल टप्पा 1 आणि 2 च्या आपातकालीन झडप भुयार येथील भिंतीतून गळती होत असल्याचा खुलासा जलसंपदा विभागाकडून देण्यात आलाय. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव दिपक मोडक यांच्याकडून देखील धोका नसल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.