“शंभूराज देसाईंचा चंबू झालाय”; ठाकरे गटाने सीमावादावरून शंभूराज देसाईंना डिवचले….

सीमावादावरून भास्करराव जाधव यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी कर्नाटकात जाऊन त्यांच्या मुख्यमंत्र्यांना दम द्या असं जाहीर आव्हान दिले आहे.

शंभूराज देसाईंचा चंबू झालाय; ठाकरे गटाने सीमावादावरून शंभूराज देसाईंना डिवचले....
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 10:53 PM

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटल्यानंतर आपल्या राज्यातील मंत्र्यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी इकडे यायचे नाही असा दम भरला. तेव्हापासून मंत्री शंभूराज देसाई यांचा चंबू झाला असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी केली. महाराष्ट्र-कर्नाटक वाद उफाळून आल्यानंतर स्थापन केलेल्या समिती आणि समन्वय मंत्री म्हणून शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली. ज्या वेळी सीमावाद जोरदारपणे उफाळून आला त्यावेळी चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांनी बेळगावमध्ये जाऊन मराठी भाषिकांची भेट घेणार असल्याचे ठरवले होते.

मात्र त्याच वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये असा आदेश काढल्यानंतर शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही मंत्री सीमाभागात गेले नाहीत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सीमावादावरून भास्करराव जाधव यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी कर्नाटकात जाऊन त्यांच्या मुख्यमंत्र्यांना दम द्या असं जाहीर आव्हान दिले आहे.

त्यामुळे सीमावादावरून राज्यातील नेत्यांचा वाद उफाळून येणार का असा सवाल आता करण्यात येत आहे. भास्करराव जाधव यांनी शिंदे गटावर टीका करताना त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे.

भाजप बांडगूळ आहे ते कुणालाही मोठं होऊ देत नाही. भाजपसोबत ज्या पक्षांनी मैत्री केली ते पक्ष संपले असल्याची टीका त्यांनी केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हापासून महाराष्ट्रातील नेत्यांना दम दिला आहे तेव्हापासून शंभूराज देसाई यांचा चंभू झाल्याची सडकून टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.