“बाकी सर्व बडवे आणि भडवे, त्यातला एक पाटणमध्ये जन्माला आला”; शंभूराज देसाई यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्याचा घणाघात

शिवसेनेच्या या वारीत कोकण नंतर पाटण तालुक्याचा मोलाचं योगदान आहे मात्र या सगळ्याचा इतिहास आणि सेनेचा इतिहास शंभुराजला माहिती नाही असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

बाकी सर्व बडवे आणि भडवे, त्यातला एक पाटणमध्ये जन्माला आला; शंभूराज देसाई यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्याचा घणाघात
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 12:05 AM

सातारा : राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गट आणि शिवसेना एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच आज पुन्हा एकदा शिवसेनेवर सडकून टीका करण्यात आली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटावर आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाा साधला जात आहे. तर आज मात्र खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याच पाटण मतदार संघात येऊन त्यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर ड्राय डेच्या नावाखाली ते पैसा गोळा करत असल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.लखासदार संजय राऊत यांनी पाटण तालुक्यातील गुढे गावात शिवसंवाद मेळावा घेत त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना बडवे आणि भडवा असा उल्लेख करत त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच यावेळी शिवसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाचे जोरदार शक्तीप्रदर्शनही यावेळी करण्यात आले आहे.

पुन्हा भगवा फडकणार

खासदार संजय राऊत यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका करताना सुरुवातीलाच त्यांच्यावर सडकून टीका करताना म्हणाले की, शंभूचे नाव घेऊ नका असा टोलाही त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच दिला आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, पाटण तालुक्यातील हे चित्र बघून 2024 ची निवडणूक ही पाटण तालुक्याला नवीन दिशा देणारी ठरणार आणि येथे पुन्हा भगवा फडकणार असा इशाराही त्यांनी शंभूराज देसाई यांना दिला आहे.

शिवसेनेवर शिंदे गट दावा सांगत आली आहे, त्याचप्रमाणे न्यायालयाच्या निकालाप्रमाणे शिवसेनाही शिंदे गटाकडे असल्याचे सांगितले गेले तरी शिवसेना एकच आहे, हा गट तो गट नाही, सेना ठाकरेंची असल्याचेही संजय राऊत यांनी त्यांना ठणकावून सांगितले. त्यामुळे आता 2024 च्या निवडणूकित 40 गद्दारांना गाडावं लागेल असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

बडवे आणि भडवे आहेत

मंत्री शंभुराज देसाई यांना ड्राय डेची चिंता आहे, मात्र ड्राय डेच्या नावाखाली पैसे गोळा करतो, यावर गुन्हा दाखल।झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका करताना म्हणाले की, बाकी सर्व बडवे आणि भडवे आहेत त्यातला एक पाटणमध्ये जन्मला आला आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली. तसेच उद्धव ठाकरेंचं लोकाभिमुख सरकार या गदारांनी बेइमानी करून पाडलं आहे, त्यामुळे यातला एकही निवडून येणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

सेना संपवण्याची कारस्थानं

शिवसेनेच्या या वारीत कोकण नंतर पाटण तालुक्याचा मोलाचं योगदान आहे मात्र या सगळ्याचा इतिहास आणि सेनेचा इतिहास शंभुराजला माहिती नाही असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. बंडखोरी केली असली तरी सेना संपवण्याची कारस्थानं ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत झाली आहेत असा टोलाही त्यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.

सेनेच्या पाठीत खंजीर

पाटण तालुक्यात येऊन त्यांनी शंभूराज देसाई यांची त्यांनी सगळी कुंडलीच बाहेर काढत ते पहिल्यांदा आमदार झाले तेव्हाही लाल दिवा दिला तरीही या 40 जणांनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा गंभीर आरोप करत आहे ती सेना बरखास्त करू घरी बसू मात्र या गद्दारांना दारात उभं करणार नाही अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.