महाराष्ट्रात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीचा विरोधक? अजित पवार नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात या घडामोडी वाढण्याची जास्त शक्यता आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या दरम्यान अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीचा विरोधक? अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 6:32 PM

सातारा : महाविकास आघाडीची वज्रमूठ एकीकडे घट्ट करण्याचे प्रयत्न सुरु असताना वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या एका दाव्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार यांनी पुस्तकात जो दावा केलाय त्यावरुन ठाकरे गटात नाराजी आहे, अशी चर्चा आहे. असं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ अग्रलेखात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट भाजपमध्ये जाण्यासाठी बॅग भरुन तयार असल्याचा दावा केलाय. या दरम्यान अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.

भाजपचा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी एकत्रपणे निवडणूक लढणं जास्त गरजेचं असल्याचं मत महाराष्ट्रातील विरोधकांचं आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांच्या तीन मोठ्या सभा महाराष्ट्रातही पार पडल्या. मविआच्या वज्रमूठ सभेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण या सभेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत. असं असताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“राष्ट्रवादी साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. “देवेंद्र फडणवीस यांना आमची काळजी करण्याचं कारणच नाही. 36 जिल्ह्यांपैकी आम्ही साडेतीन जिल्ह्यांपुरते मर्यादित असू तर त्यांच्यासमोर कुणी विरोधकच नाही. कारण शिवसेनेची त्यांनी काय अवस्था केली, आम्ही तर साडेतीन जिल्ह्यातील आहोत. काँग्रेसबद्दलही असेच दावे असतात. काँग्रेस संपली पाहिजे”, असं ते वक्तव्य करतात.

हे सुद्धा वाचा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कुणाला विजय मिळेल? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. “आता काही सांगता येत नाही. आपण कुणीही ज्योतिषी नाही. प्रत्येकजण आपापल्या परिने सांगतंय. सुरुवातीच्या काळात काँग्रेसचं वातावरण चांगलंय असं मीडियात सातत्याने वाचायला मिळत होतं. नंतर बजरंग दलाबद्दल भूमिका घेतल्यानंतर मग तिथे एकदम भाजपच्या मोठ्या नेत्यांना बजरंगाची मूर्ती देण्याची परंपरा सुरु झाली. भावनिक माध्यमातून निवडणुकीचं वातावरण वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करण्यात आला”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

सरकारला धोका नाही का? अजित पवार म्हणतात…

यावेळी सत्ताधाऱ्यांकडून आपल्या सरकारला धोका नाही, असा दावा केला जातोय. याबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी “प्रत्येक सरकार आपलं सरकार असेपर्यंत सरकारला धोका नाही, असंच म्हणेल. आम्हाला प्रत्येक मताला उत्तर देण्याचं कारण नाही. फार महत्त्वाचं असेल तर आम्ही त्याची नोंद घेऊन उत्तर देवू. हा विषय नोंद घ्यावासा वाटत नाही,”, असं उत्तर दिलं.

राष्ट्रवादीचा एक गट भाजपमध्ये जाण्यासाठी बॅग भरुन तयार आहे, असं संजय राऊतांनी ‘सामना’ अग्रलेखात म्हटलं होतं. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता “त्यावर शरद पवार यांनी परवा काय सांगितलं ते ऐकलं. आमच्या राष्ट्रीय नेत्याने सांगितल्यानंतरही दुसरा कुणी काही बोलत असेल तर त्याला महत्त्व देण्याचं काही कारण आहे, असं मला वाटत नाही”, असं अजित पवार म्हणाले.

‘सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव’

“नवं सरकार आल्यापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आहे. कोरेगावमध्ये PI ची पोस्ट रिक्त आहे. पण तिथे जायला कुणी तयार नाही. तिथे API आहे. प्रत्येकजण दबावाखाली आहे. ज्या ठराविक 40 लोकांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल प्रशासनातही अस्वस्थता पाहायला मिळत आहे. अधिकारी बोलून दाखवता. अधिकाऱ्यांना विचारा काय परिस्थिती आहे. फक्त त्यांचं नाव बाहेर प्रसिद्ध करु नका. कारण त्यांना काम करायचं असतं”, असं अजित पवार म्हणाले.

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.