मैत्रिणच बनली फेक बॉयफ्रेंड अन् झाला उलटाच गेम, साताऱ्यात खळबळ, एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर पेक्षाही भयंकर घटना

साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक मैत्रिणच आपल्या दुसऱ्या मैत्रिणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे. आरोपी मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर फेक मुलाचं अकाउंट बनवत मस्करी करण्याच्या हेतूने मैत्रिणीला रिक्वेस्ट पाठवली होती.

मैत्रिणच बनली फेक बॉयफ्रेंड अन् झाला उलटाच गेम, साताऱ्यात खळबळ, एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर पेक्षाही भयंकर घटना
मैत्रिणच बनली फेक बॉयफ्रेंड अन् झाला उलटाच गेम
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 5:22 PM

सोशल मीडिया हे अभासी जग आहे. इथे सगळं खरं आहे, असा विश्वास ठेवणं योग्य नाही. कारण इथे कोण व्यक्ती कधी कुणाची कशी फसवणूक करेल, याचा भरोसा नाही. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना आपण खूप सावध राहिलं पाहिजे. विशेष म्हणजे मुलींनी सोशल मीडियाचा वापर करताना सजग राहिलं पाहिजे. कोण कधी कशा पद्धतीने बोलण्यात गुंतवून फसवणूक करेल, याचा भरोसा नाही. त्यामुळे आपण सोशल मीडियावर कुणावरही सहज विश्वास टाकू नये. सोशल मिडिया खूप सहजपणे उपलब्ध असल्यामुळे कुणीही त्यावर सहज उपलब्ध असते. सोशल मीडियाचा तसा फायदा आहे. या सोशल मीडियामुळे संपूर्ण जग जवळ आलं आहे. पण या सोशल मीडियाचा वापर काही जण फसवणूक करण्यासाठी किंवा इतरांना चुकीची माहिती देण्यासाठीदेखील करतात. त्यामुळे आपल्याला त्याचा धोका देखील उद्भवू शकतो. कारण सोशल मीडियाचा वापर करत असताना अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपण नैराश्यात जातो आणि नको तो टोकाचा निर्णय घेतो. साताऱ्यात अशीच काही घटना समोर आली आहे.

साताऱ्यात एका तरुणीने स्वत: ला संपवण्याचा टोकाता निर्णय घेतला. तिचा हा निर्णय घेण्यामागील कारण समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. एका जवळच्या मैत्रिणीमुळेच तिला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. सुरुवातीला संबंधित घटना ही एक आत्महत्येची घटना वाटत होती. पण तरुणीच्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय असावं? असा प्रश्न उपस्थित होता. तरुणीचं वैयक्तिक आयुष्य, कुटुंब सर्व व्यवस्थित होतं. असं असताना तिने आत्महत्या का केली असावी? असा प्रश्न तिच्या कुटुंबियांकडूनही उपस्थित करण्यात येत होता. अखेर या आत्महत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांच्या तपासात या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर आलं?

साताऱ्याच्या तरुणीच्या आत्महत्येला तिची मैत्रिणीच कारणीभूत ठरल्याचं समोर आलं आहे. तिच्या मैत्रिणीने मस्करी करण्यासाठी एका मुलाच्या नावाचं अकाउंट उघडलं होतं. तिने स्वत:च्याच मैत्रिणीला फ्रेंड रिकवेस्ट पाठवली. यानंतर संबंधीत मुलीनं ही रिकवेस्ट एक्सेप्ट केली. नंतर ही मुलगी रिकवेस्ट पाठवणऱ्या मनिष नावानं बनावट अकाऊंट असणाऱ्याच्या प्रेमात पडली. मात्र मनिषला भेटण्याचा आग्रह मैत्रीण करु लागल्यावर तिच्या मैत्रिणीची चांगलीच पंचायत झाली.

यानंतर मैत्रिणीची फसवणूक करणाऱ्या तरुणीने शिवम पाटील नावाने दुसरं अकाऊंट बनवत मनिष मृत झाला असल्याचं सांगितलं. तिला मनिषचे दवाखान्यातील नकली फोटो देखील पाठवले. यामुळे तिच्या 24 वर्षीय मैत्रिणीला हा धक्का सहन झाला नाही. तिने विरहातून गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना 12 जूनला घडली. यानंतर पोलिसांत ही नोंद अकस्मात मृत्यू म्हणून झाली होती. मात्र पोलिसांनी याचा तपास केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित मैत्रिणीने हा सर्व प्रकार इंस्टाग्रामच्या माध्यमातून घडवून आणल्याचं लक्षात आल्यानंतर मृत मुलीच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. या घटनेची नोंद वाठार पोलीस ठाण्यात झाली आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.