सातारा जिल्हा-सत्र न्यायालयाचे ‘ते’ न्यायाधीश मोठ्या अडचणीत, त्यांचा जामीनही फेटाळला

लाच प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या अटकपूर्व जामीनासाठी आज सातारा न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती निकम यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

सातारा जिल्हा-सत्र न्यायालयाचे 'ते' न्यायाधीश मोठ्या अडचणीत, त्यांचा जामीनही फेटाळला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 8:42 PM

सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह 4 जणांविरोधात 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्या वतीने सातारा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी जिल्हा न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. असं असलं तरीही उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना अटक होऊ शकत नसल्यामुळे अद्याप या प्रकरणात न्यायमूर्ती यांना अटक करण्यात आलेली नाही.

नेमके प्रकरण काय?

या प्रकरणात तक्रारदार युवतीचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना जामीन मंजूर करण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्या माध्यमातून त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मागितली होती. यानंतर संबंधित युवतीने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. यानंतर पुणे लाचलुचपत विभागाने न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्यासह चौघांवर सापळा रचून ही कारवाई केली होती.

न्याय कुणाकडे मागायचा?

संबंधित प्रकरण हे अतिशय धक्कादायक आहे. सर्वसामान्य जनता ही न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जाते. पण तिथे न्यायाधीशच अशाप्रकारे वागत असतील तर मग न्यायाची अपेक्षा कुणाकडे करायची? असा प्रश्न उपस्थित होतोय. संबंधित न्यायाधीशांवरील आरोप अद्याप पूर्णपणे सिद्ध व्हायचे असले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत काही जण सापडले आहेत. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे न्यायाधीशांकडे आपण खूप अपेक्षाने पाहत असतो. या महाराष्ट्राला आणि देशाला चांगल्या न्यायमूर्तींची परंपरा लाभली आहे. देशाचा इतिहासही अभिमानास्पद राहिला आहे. पण याचा विसर संबंधित न्यायाधीशांना झाला असेल का? किंवा अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्या आरोपींना आपण काय करतोय? याचं भान का नसावं? असादेखील प्रश्न उपस्थित होतोय. तसेच न्यायाधीशच अशाप्रकारे वागायला लागले तर सर्वसामान्य जनतेने न्यायासाठी नेमकं कुणाकडे जावं? हा देखील आता महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. याप्रकरणी आता काय-काय कारवाई होते, ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.