साताऱ्यात कास पठारावरील एका हॉटेलमध्ये नाचवल्या बारबाला, व्हिडीओ व्हायरल

साताऱ्यातील कास परिसरातल्या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या पार्टीत बारबाला नाचवण्यात आल्या, मद्यप्राशन झाले आणि हिंसाचारही झाला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, पण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

साताऱ्यात कास पठारावरील एका हॉटेलमध्ये नाचवल्या बारबाला, व्हिडीओ व्हायरल
साताऱ्यात कास पठारावरील एका हॉटेलमध्ये नाचवल्या बारबाला
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 6:57 PM

साताऱ्यातील कास परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कास परिसरात एका हॉटेलवर कोणत्याही परवानगी शिवाय रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या रेव्ह पार्टीत अतिशय घृणास्पद प्रकार बघायला मिळाला. या रेव्ह पार्टीत बारबाला बोलावण्यात आल्या होत्या. या बारबालांना रेव्ह पार्टीत नाचवण्यात आलं. बारबालांच्या डान्स करतानाचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर रेव्ह पार्टीत काय नंगानाच सुरु होता याचा अंदाज आपल्याला येईल. काहीजण पार्टीत नाचणाऱ्या बारबालांना स्पर्श देखील करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर काहीजण बारबालांसोबत नाचत असल्याचं व्हिडीओत बघायला मिळत आहे. या रेव्ह पार्टीचं बिंग फुटण्यामागे त्याचे व्हायरल झालेले व्हिडीओ आणि वाद कारणीभूत ठरला आहे.

या पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या रेव्ह पार्टीनंतर या ठिकाणी वाद होऊन राडा देखील झाला. त्यात दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. पण या राड्याची किंवा रेव्ह पार्टीची पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली नाही. याउलट संबंधित प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. जणू काही काहीच घडलेलं नाही, असं भासवण्यात आलं. संबंधित व्हिडीओत बारबाला नाचताना, तिथे उपस्थित लोकं मद्यप्राशन करताना आणि नाचताना स्पष्टपणे दिसत आहेत. तसेच दोन गटात राडा झाल्यानंतर जी हाणामारी झाली त्याचीदेखील परिसरात दबक्या आवाजात चर्चा आहे. पण संबंधित प्रकरण पोलिसांपर्यंत न पोहोचवता दाबण्याचा प्रयत्न करण्याच आल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणी कुणीही तक्रार केलेली नसल्यामुळे अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पण घटनेचे व्हिडीओ समोर आल्यानंतर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात कोणत्याही पोलीस बंदोबस्तात ही रेव्ह पार्टी झाली नसल्याचे शेख म्हणाले आहेत. तसेच या प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर तयार करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.