न्यायाधीशच गोत्यात; लाच प्रकरणात कोर्टाचा दणका, अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; शुक्रवारी होणार फैसला
Session Judge Interim Bail Reject : सातारा न्यायालयातील सत्र न्यायाधीशांना लाच प्रकरणात कोर्टाने दणका दिला. त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. खासगी व्यक्तीमार्फत 5 लाखांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. प्रकरणात आता शुक्रवारी पुढील निर्णय होईल.
सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला. त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. खासगी व्यक्तीमार्फत 5 लाखांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. याप्रकरणाने न्यायालयीन व्यवस्थेत एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे न्याय विकत देण्याचा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया विधी क्षेत्रात उमटत आहे. दरम्यान या प्रकरणात शुक्रवारी सुनावणी अपेक्षित आहे.
काय आहे प्रकरण
सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासमोर एका फसवणूक प्रकरणात सुनावणी सुरू होती. या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर करण्यासाठी त्यांनी खासगी व्यक्तीमार्फत पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा त्यांचावर ठपका ठेवण्यात आला. न्यायाधीश निकम यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात संशयीत आरोपीला जामीन देण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोपा तक्रारकर्त्या तरुणीने केला आहे.
न्यायालयने जामीन अर्ज फेटाळला
या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान अॅन्टी करप्शन अधिकारी आणि सरकारी वकिलांची बाजू ऐकल्याशिवाय एकतर्फी निर्णय देता येणार नाही, असे मत न्यायालयाने दिले आणि निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. प्रकरणात आता शु्क्रवारी पुढील सुनावणी अपेक्षित आहे.
न्यायाधीशांना अटकेची भीती
सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी या लाचप्रकरणात पोलिसांकडून अटक होऊ नये, यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. लाचलुचपत खात्याचे अधिकारी आणि सरकारी वकिलांची बाजू ऐकल्याशिवाय त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. याप्रकरणात पोलिसांकडून अटक टळावी आणि कायद्याचे संरक्षण मिळावे यासाठी न्यायाधीश निकम यांनी हा अर्ज दाखल केला आहे. आता या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होईल. पुणे येथील एका तरुणीच्या तक्रारीनंतर न्यायाधीशांविरोधात लाचप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.