16 आमदार अपात्र करणं खायची गोष्ट आहे का?; निकालाआधी शिंदे गटाच्या आमदाराचा थेट सवाल

Shivsena MLA Mahesh Shinde ond Shivsena MLA Disqualification Case Result : राष्ट्रीय अध्यक्षाने फोन केला तरी साधा सरपंच...; आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधी शिंदे गटाचा आमदार आक्रमक. निकाला आधी परखड सवाल. म्हणाले, 16 आमदार अपात्र करणं, खायची गोष्ट आहे का...

16 आमदार अपात्र करणं खायची गोष्ट आहे का?; निकालाआधी शिंदे गटाच्या आमदाराचा थेट सवाल
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 2:12 PM

सातारा | 10 जानेवारी 2024 : शिवसेनेतील आमदारांच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणाचा आज दुपारी चार वाजता निकाल लागणार आहे. या निकालाआधी दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत. अशातच साताऱ्यातून शिंदे गटातून प्रतिक्रिया येत आहे. साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट सरपंचपदाच्या आपात्रतेवर भाष्य केलं आहे. राष्ट्रीय अध्यक्षाने फोन करून सुद्धा गावाकडचा एक सरपंच तीन वर्षे अपात्र होत नाही. तर 16-16 आमदारांना अपात्र करणं खायची गोष्ट आहे का?, असा सवाल आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

विरोधकांवर निशाणा

आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत बोलत असताना शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आम्ही अपात्र होणार नाही असा शंभर टक्के विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केली नाही आम्ही कुठला ही कायदा मोडला नाही. त्यामुळे अपात्र होण्याचा विषयच येत नाही.गावाकडचा एक सरपंच राष्ट्रीय अध्यक्षाने फोन करून सुद्धा अपात्र होत नाही तर सोळा-सोळा आमदार अपात्र करणं खायची गोष्ट आहे का?, असं महेश शिंदे म्हणाले.

संजय राऊतांना टोला

जे विरोधक अपात्र तेचे आरोप करत आहेत. ते संजय राऊत किंवा इतर कोणी असतील. त्यांनी कधी ग्रामपंचायतची निवडणूक तरी लढवली आहे का? ग्रामपंचायतची निवडणूक न लढलेले लोक आम्हाला अपात्र करण्याच्या गोष्टी करत आहेत, असा टोला महेश शिंदे यांनी यावेळी बोलत असताना लगावला आहे.

शहाजीबापू यांची प्रतिक्रिया काय?

शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. निकाल आमच्याविरोधात लागणार नाही. कारण शिवसेना पक्षात फूट पडलेली नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे पक्षात फूट पडलेली नाही. आमचा पक्ष एकसंध आहे. त्यामुळे आमच्याविरोधात निकाल येणार नाही. आमच्या बाजूनेच निकाल लागेल, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.