Video | ‘त्या काळात मावळा म्हणून जन्माला आलो असतो तर धन्य झालो असतो’, उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी

Udyanrane Bhosale : पोवई नाका येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले भावूक झाले.

Video | 'त्या काळात मावळा म्हणून जन्माला आलो असतो तर धन्य झालो असतो', उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी
उदयनराजे भोसले पुन्हा इमोशनल
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 12:14 AM

सातारा : संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंतीचा (Shiv Jayanti) उत्साह पाहायला मिळाला. इकडे सातारा जिल्ह्यातही (Satara District) सर्वत्र शिवजयंती साजरी करण्यात आली. साताऱ्यातील पोवई नाका येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले भावूक झाले. मी त्या काळात मावळा म्हणून जन्माला आलो असतो, तर धन्य झालो असतो, असं उदयनराजे यांनी म्हटलंय. त्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) याचे डोळे पाणावले होते. शिवजयंतीनिमित्त एकत्र आलेला जनसमुदाय पाहून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपतींचा इतिहासच्या आठवणींनी उजाळा दिला. यावेळी ते भावूक झाले होते. यानंतर प्रतिक्रिया देताना उदयनराजे गहिवरले होते. 300 वर्षांनंतरही छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा जल्लोष पाहून ते किती महान नेते होते, याची निव्वळ कल्पना आपण करु शकतो, अशा शब्दांत उदयनराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भेदभावाला थारा नाही!

यावेळी महाआरती झाल्यानंतर उदयनराजे भोसले बोलत होते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यूनंतर तिसरं झालं, की लोकं विसरतात. दहावं तेरावं तर लांबच राहिलं. शिवरायांची कधीच भेदभाव केला नाही. लोकशाहीचा पाया छत्रपती शिवरायांनी तयार केला. लोकांचा सहभाग असल्याशिवाय ते शक्य नाही, असंही उदयनराजे यांनी म्हटलंय. शिवाजी महाराज लोकांसाठी लढत होते, असंही ते म्हणालेत.

हॅट्स ऑफ टू यू…

छत्रपती शिवरायांची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवली जाते. छत्रपती सर्व सामान्य जनसाठी लढले. मी त्यांच्या कुटुंबात जन्मलो, हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो, असही उदयनराजेंनी यावेळी म्हटलंय. त्यांचे आदर्श टोळ्यांसमोर ठेवून मी माझं काम करत आलो. शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष होते. एका आयुष्यात एवढे किल्ले बांधणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. हॅट्स ऑफ टू यू, असं म्हणत उदयनराजेंनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलंय.

..तर धन्य झालो असतो!

गाड्या असताना आज लोकं म्हणतात की मला कंटाळा आला. पण त्या काळी शिवाजी महाराजांनी घोड्यावरुन प्रवास करत अख्खं साम्राज्य उभारलं. छत्रपती शिवराय खरंच एक युगपुरुषच होते, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. मी त्या काळात जन्मला आलो असतो, तर मी मावळा म्हणून धन्य झालो असतो, असंही त्यांनी म्हटलं. यानंतर उदयनराजेंच्या डोळे पाणवले होते. आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देताना उदयनराजेंच्या गहिवरुन आलं होतं.

संबंधित बातम्या :

फडणवीस म्हणतात महाराजांचे कार्यक्रम अडवणाऱ्यांना महाराजच शिक्षा करतील, कुणी अडवले कार्यक्रम?

aसंदीप क्षीरसागरांच्या ” मैं झुकेगा नही” नंतर योगेश क्षीरसागर यांचे ‘मैं हूं डॉन’; चर्चा फक्त बीडच्या राजकारणाची

Video | धनंजय मुंडेंचा स्क्वेअर कट पाहिलात का? सरपंच प्रीमिअर लीगमध्ये कुटल्या 7 चेंडूत 11 धावा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.