शिवकालीन वाघनखांची पहिली झलक, शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, साताऱ्यात ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शन खुलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाघनखांच्या प्रदर्शानाच्या कार्यक्रमांचं उद्घाटन पार पडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा बाजूला करुन वाघनखांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. यानंतर पहिल्यांदाच शिवकालीन वाघनखांची पहिली झलक महाराष्ट्राला बघायला मिळाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आता महाराष्ट्रात याची देही याची डोळा पाहता येणार आहे. शिवरायांनी याच वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता. ही ऐतिहासिक वाघनखं आता लंडनहून साताऱ्यात आणण्यात आली आहेत. साताऱ्यात वस्तू संग्रहालयात ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फक्त वाघनखंच नाहीत तर इतर शस्त्रास्त्रांचंदेखील प्रदर्शन शिवप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. या ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित आहेत. तसेच लंडनहून वाघनखं घेऊन आलेल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चंड हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाघनखांच्या प्रदर्शानाच्या कार्यक्रमांचं उद्घाटन पार पडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा बाजूला करुन वाघनखांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. यानंतर पहिल्यांदाच शिवकालीन वाघनखांची पहिली झलक महाराष्ट्राला बघायला मिळाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आल्यानंतर आता सर्वसामान्यांनाही या वाघनखांचं दर्शन घेता येणार आहे. ही वाघनखं पाहता येणार आहे. साताऱ्यात वाघनखनांचं प्रदर्शन आहे. त्यामुळे सातरकरांना सुद्धा उत्सुकता आहे. या वाघनखांची लांबी 8.6 सेमी इतकी आहे. या वाघनखांचं वजन हे केवळ 49 ग्रॅम इतकं आहे.
कार्यक्रम कसा पार पडला?
सातारा येथील जिल्हा परिषद सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आजच्या सोहळ्याला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘गडगर्जना’ हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यानंतर मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवर हे वस्तू संग्रहालयात पोहोचले. तिथे वाघनखांसमोरील पडदा बाजूला सारुन वाघनखांसह शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर सर्व मान्यवर वस्तुसंग्रहालयातून जिल्हा परिषद सभागृहात परतले. या दरम्यान साताऱ्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रॅलीदेखील काढण्यात आली. यानंतर जिल्हा परिषद सभागृहात स्वागत-सत्कार समारंभ पार पडला.