Satara : साताऱ्यातले दोन्ही राजे पुन्हा आमनेसामने, उदयराजेंमुळे एमआयडीसी संपली-शिवेंद्रराजे
साताऱ्यातील पंडीत ऑटोमोटीव्ह कंपनी (Automotive) आमदार शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीर रित्या खरेदी केल्याचा आरोप अप्रत्यक्षरित्या उदयनराजे यांनी केला आहे.
सातारा : साताऱ्यातले राजकारण नेहमी चर्चेत असते ते उदयनराजे (Udayanraje) आणि शिवेंद्रराजेंमुळे(Shivendraraje). दोन्ही राजेंमधील राजकीय वैर साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. दोन्ही राजे आता भाजपमध्ये आल्यावर किमान आतातरी हे संपेल असे सर्वांना वाटत होते, मात्र अजूनही एकमेकांना टोमणे मारायला राजे विसरत नाहीयेत. आता पुन्हा हा वाद पेटला आहे. साताऱ्यातील पंडीत ऑटोमोटीव्ह कंपनी (Automotive) आमदार शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीर रित्या खरेदी केल्याचा आरोप अप्रत्यक्षरित्या उदयनराजे यांनी केला आहे. कामगारांवर अन्याय करणाऱ्या लोकांना राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली देवून चिरडलं पाहिजे असं विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंना उद्देशून केलं होतं. या नंतर आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषद घेवून उदयनराजेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. मला चिरडायचं असेल तर हत्तीची गरज नाही उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन असा टोला लगावला आहे.
कंपन्या बाहेर जायला उदयनराजे जबाबदार-शिवेंद्रराजे
साताऱ्यातील एमआयडीसी संपायला उदयनराजेच जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलंय तसंच कारखानदारांकडून हप्ते घेणं, त्यांना दमटाटी करणं यामुळेसुद्धा साताऱ्यातील एमआयडीसी मध्ये कंपन्या आल्या नाहीत आसा आरोपही शिवेंद्रराजे यांनी उदयराजेवर केला आहे. उदयनराजे यांच्यामुळेच असलेल्या कंपन्या निघून गेल्या असल्याचा आमदार शिवेंद्रराजें म्हणाले आहेत. तेसच त्यांनी खरेदी केलेल्या जागेबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. मी ही कंपनीची जागा खरेदी करताना संपूर्ण कायदेशीरपणे खरेदी केली आहे. त्यामुळे उदयनराजेंचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचंही शिवेंद्रराजे म्हणाले.
याआधीही खासदारकी सोडण्यावरून टोलेबाजी
शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना नारळफोड्याची उपमा दिल्यानंतर उदयनराजेंनी सुद्धा शिवेंद्रराजेंवर टिका करत त्यांची बुद्धी छोट्या मुलांच्या पेक्षासुद्धा कमी आहे असे म्हटले होते. शिवेंद्रराजे हे बालीश विधानं करत असल्याचं सांगत त्यांनी टीका करताना भान राखायला हवं असं ते म्हणाले होते. मात्र याला शिवेंद्रराजेंनी तेव्हाी तिखट उत्तर दिलंय उदयनराजेंची बुद्धी जर आमच्या पेक्षा जास्त आहे तर लोकांनी नोवडून दिलेलं खासदारकीचं पद सोडून पुन्हा उभं राहून पराभूत झालात. याला काय म्हणायचं? असा सवाल शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही राजे अनेकदा आमनसामने आले आहेत. कधी टोलनाक्यावरून तर मग कधी साध्या दारूच्या दुकानावरून अनेकदा वाद रंगलाय. आत्ताची स्थिती पाहता आणखी काही वर्षेही हे असेच चालण्याची शक्यता आहे.