“अजितदादांसारखा नेता आमच्यासोबत आला तर आनंदच आनंद”; केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगितलं…

अजित पवार हे भाजपमध्ये येऊ शकत नाहीत मात्र सोबत येऊ शकतात. तरीही अजित पवार हे भाजपमध्ये आले तरी त्यांचे स्वागतच असल्याचे सांगत शरद पवारांच्या तालमीत वाढलेला नेता असल्यामुळे त्यांच्यासारखा नेता मिळाल्यास आम्हाला आनंदच होईल असंही ते म्हणाले.

अजितदादांसारखा नेता आमच्यासोबत आला तर आनंदच आनंद; केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगितलं...
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 10:45 PM

सातारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार आणि भावी मु्ख्यमंत्री अशी फलकबाजी झाल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय वर्तुळात त्यावरून जोरदार चर्चा सुरु झाल्यानंतर त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टपणे मी भाजपसोबत जाणार नसून राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर पडदा पाडला. त्यानंतरही त्यांच्या भाजप प्रवेशावरून जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तिच री ओढत अजित पवार आमच्यासोबत आले तर आनंदच होईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नावाचे मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असणारे बॅनर काही ठिकाणी लागले आहेत.

त्यावर तुमचं मत काय असा प्रश्न विचारला असता रामदास आठवले म्हणाले की, अजितदादांसारखा नेता जर आमच्या सोबत म्हणजेच भाजप,शिवसेना,आरपीआय सोबत आले तर आम्हाला आनंदच होईल, मात्र तरीसुद्धा अजित पवार हे काय लगेच मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील असंही त्यांनी मिश्किलपणे सांगितले

अजित पवार यांच्या बॅनरची चर्चा राज्यात जोरदारपणे चालू आहे. त्यावरही बोलताना त्यांनी सांगितले की, बॅनर लावणारे कार्यकर्ते हे उत्साही असतात. अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, आणि तशी इच्छा अनेकांची असते.

त्यामुळे अशी इच्छा पूर्ण होतेच असं नाही असा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना राष्ट्रवादीला जागा जास्त मिळवूनदेखील काँग्रेसच्या हट्टापायी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळाले होते, नाही तर त्याच वेळेस कदाचित अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगतिले.

तसेच अजित पवार यांना मुख्यमंत्री पदासाठी लवकर संधी मिळेल असे मला वाटत नाही असंही त्यांनी यावेळी सांगतिले.

यावेळी ते म्हणाले की, अजित पवार हे भाजपमध्ये येऊ शकत नाहीत मात्र सोबत येऊ शकतात. तरीही अजित पवार हे भाजपमध्ये आले तरी त्यांचे स्वागतच असल्याचे सांगत शरद पवारांच्या तालमीत वाढलेला नेता असल्यामुळे त्यांच्यासारखा नेता मिळाल्यास आम्हाला आनंदच होईल असंही ते म्हणाले.

शिवसेनेच्या काही आमदारांनी ज्यावेळेस बंड केला त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. यानंतरच्या काळात त्यांनी एका मिटींगच्या आधारावर व्हीप पाठवून दिलेला आहे.

हाऊस मध्ये मतदान असेल त्यावेळेसच हा व्हीप ग्राह्य धरला जातो. यामुळे सुप्रीम कोर्टाकडून निर्णय हा शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने येईल असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.