शरद पवार यांना तीन मोठ्या संकटात साथ देणारे कोण आहेत विक्रमसिंग पाटणकर?
मला वाटतं, आम्ही तिसऱ्यांना शरद पवार यांच्यासोबत आहोत. तीन संकटात राज्यातल्या जनतेला शरद पवार यांनी बाहेर काढलं आहे. या संकटातून शरद पवार हे राज्यातल्या जनतेला बाहेर काढतील.
सातारा : अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभाग घेतला. हे शरद पवार यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. काल राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोणता, या प्रश्नाचे उत्तर हसत देत शरद पवार असे दिले. शरद पवार वयाच्या ८३ व्या वर्षी योद्ध्यासारखे लढत आहेत. त्यांना साथ दिली आहे ती काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी. त्यापैकी त्यांच्या प्रत्येक संकटात शरद पवार यांना नेहमी साथ देणारे पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंग पाटणकर आहेत.
राज्याला नवी दिशा देतील
विक्रमसिंग पाटणकर म्हणाले, मला वाटतं, आम्ही तिसऱ्यांना शरद पवार यांच्यासोबत आहोत. तीन संकटात राज्यातल्या जनतेला शरद पवार यांनी बाहेर काढलं आहे. या संकटातून शरद पवार हे राज्यातल्या जनतेला बाहेर काढतील. राज्याला दिशा देतील. असा विश्वास व्यक्त केला.
हीच शरद पवार यांची ताकद
साताऱ्यात युवक शरद पवार यांच्यासोबत आले आहेत. हीच शरद पवार यांची ताकद आहे. शरद पवार यांना तीन संकटात साथ दिली आहे. या तिन्ही संकटात शरद पवार हे सावरले आहेत.त्यांनी राज्याला नवी दिशा दिली असल्याचं विक्रमसिंग पाटणकर यांनी म्हंटलं.
यांनीही दिली शरद पवार यांना साथ
शरद पवार यांना अशीच साथ देणारे आणखी एक महत्त्वाचे नेते म्हणजे जितेंद्र आव्हाड. युवक काँग्रेसपासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाला सुरुवात केली. शरद पवार यांना ते बाप मानतात. शरद पवार यांच्यासोबत सावलीसारखे उभे राहतात. आज शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना विधिमंडळातील पक्षाचे प्रदोत म्हणून जाहीर केले. अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेला जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तरं दिली.