Kolhapur By Election Result 2022 : कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, भाजपच्या स्टॅटेजीवर बोट

Kolhapur By Election Result 2022 : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. 18 हजार 838 मताधिक्य मिळवून त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केला आहे.

Kolhapur By Election Result 2022 : कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, भाजपच्या स्टॅटेजीवर बोट
कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजयImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 1:32 PM

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur North Election Result) जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. 18 हजार 838 मताधिक्य मिळवून त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केला आहे. जयश्री जाधव (jayshree jadhav) या विजयी होताच महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला. राज्याचे मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील (satej patil) यांनी यावेळी मीडियाशी संवाद साधत भाजपवर जोरदार हल्ला केला. भाजपने कोल्हापुरात हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरची भूमी ही शाहू महाराजांची भूमी आहे. ही समतेची भूमी आहे. कोल्हापूरकरांनी भाजपचे मनसुबे उधळून लावले आहेत. आम्ही विकासाची कामे केली. गेल्या अडीच वर्षात आम्ही केलेलं काम याचा हा कौल आहे. आम्हाला 91 हजार मते मिळाले. त्यात शिवसेनेची मते होती. त्यामुळेच आमचं मताधिक्य वाढलं आहे, असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. ते मीडियाशी बोलत होते.

शाहू महाराजाच्या भूमीनं समतेचा संदेश दिला आहे. भाजपने जे ध्रुवीकरणाचं राजकारण केलं ते कोल्हापूरच्या भूमीनं हाणून पाडलं आहे. गेल्या आठ दिवसापासून विचारतोय भाजपने आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे की ते संविधान मानतात की नाही? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वधर्म समभावाची घटना देशाला दिली. त्यावर त्यांचा विश्वास आहे की नाही याची शंका आहे. त्यांनी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. जातीजातीत तेढ निर्माण केला. तो कोल्हापूरकरांनी हाणून पाडला आहे. असल्या प्रकारचं राजकारण या पिढीला चालणार नाही हा संदेश आता कोल्हापुरातून महाराष्ट्र आणि देशाला गेला, असं सजेत पाटील म्हणाले. तसेच त्यांनी भाजपच्या स्टॅटेजीवरही टीका केली.

पुण्यातील गुंड घेऊन फिरत होते

चंद्रकांत पाटील हे पुण्यातील असल्याने त्यांचा इथे काही संबंध राहिला नाही. बाहेर गावचे सात हजार लोकं ते घेऊन आले होते. त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण ही कोल्हापूरच्या स्वाभिमानाची लढाई होती. कोल्हापूरच्या स्वाभिमानाचा विजय या ठिकाणी दिसतो. दादांनी कितीही प्रयत्न केला तरी लोकांनी शेवटी आम्हालाच मतदान केलं आहे. आम्हालाच कौल दिला आहे. दादांवर वैयक्तिक टीका करणार नाही. भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत होते. ते पुण्यातील गुंड घेऊन फिरत होते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

कोल्हापूर पुरोगामी विचाराचं

शेवटच्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 96 हजार 226 मते मिळाली. तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 77 हजार 426 मते मिळाली आहेत. त्यांनी एकूण 18 हजार 800 मतांची आघाडी घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर जयश्री जाधव यांनी मतदारांचे आभार मानले. अण्णांच्या पाठी जी जबाबदारी घेतली त्याला मतदारांनी यश दिलं आहे. हा मतदारांचा विजय आहे. महाविकास आघाडीचा विजय आहे, असं सांगतानाच कोल्हापूर हे पुरोगामी विचाराचं आहे. त्यामुळेच कोल्हापूरकरांनी आम्हाल कौल दिलाय, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Kolhapur Election Result 2022 LIVE : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसला पुन्हा “अच्छे दिन”, कमळ पुन्हा “कोमेजलं”

Kolhapur Election Result 2022 LIVE : कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय, भाजपला मोठा झटका

Maharashtra News Live Update : …तर मातोश्री रावनाची लंका होईल; रवी राणांचा उद्धव ठाकरेंना टोला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.