सातपूर ‘आयटीआय’मध्ये दिल्लीहून आले अंतिम प्रमाणपत्र; 1962 ते 2013 काळातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार
'आयटीआय'च्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अंतिम प्रमाणपत्र दिल्लीहून आले आहे. त्यांनी हे प्रमाणपत्र घेऊन जावे, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.

नाशिकः ‘आयटीआय’च्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अंतिम प्रमाणपत्र दिल्लीहून आले आहे. त्यांनी हे प्रमाणपत्र घेऊन जावे, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर येथे शिल्पकारागीर अर्थातच सी.टी.आय. प्रशिक्षण योजनेंतर्गत 1962 ते 2013 या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे अंतिम प्रमाणपत्र डी.जी.ई.टी. नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. याशिवाय आर्टिझन टू टेक्नोक्रॅट या योजनेंतर्गत उत्तीर्ण, डिप्लोमा उत्तीर्ण व लोकसेवा केंद्र योजनेंतर्गत अल्प मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्रही औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर येथे आले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रमाणपत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर, नाशिक (आय.टी.आय) येथील प्रशिक्षण विभागातून प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन प्राचार्य रा. सु. मानकर यांनी केले आहे.
…तर बारावीची समकक्षता
इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून 2 वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या 2 भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून 2 वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या 2 भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येणार आहे. आयटीआय संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो.
शिकाऊ उमेदवारी योजनेतून विद्यावेतन
युवकास आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन सर्व दृष्टीने पूर्ण कुशल बनावा यासाठी शिकाऊ उमेदवारी योजनाही अस्तित्वात आहे. शिकाऊ उमेदवारांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते. या योजनेअंतर्गत राज्यातील साधारण 11 हजार औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 1 लक्ष जागा स्थित करण्यात आलेल्या आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपेक्षा शिकाऊ उमेदवारीसाठी उपलब्ध जागा अधिक असल्याने प्रत्येक उत्तीर्ण उमेदवारास संधी उपलब्ध आहे.
358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान 01 शासकीय आयटीआय सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी 61 संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींसाठी 04 उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र 02 संस्था व 43 शासकीय आयटीआमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी 15 तर 28 आदिवासी आश्रमशाळा आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात एकूण 549 खाजगी आयटीआय आहेत.
इतर बातम्याः
मालमत्तेचा मालकी हक्क निश्चिती अन् चौकशीचे काम सुरू; नाशिक महापालिकेचा पुढाकारhttps://t.co/akdL1EU3HT#Nashik|#MunicipalCorporation|#confirmationofownership|#investigationstarted
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2021