पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंद राहणार, महापालिका आयुक्तांचे आदेश

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे शहरातील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंदच राहणार असल्याची माहीत पालिका आयुक्तांनी आज दिलीय. त्यामुळे उद्योगनगरीतील मुलांना अद्यापही ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं तूर्तास पाहायला मिळत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंद राहणार, महापालिका आयुक्तांचे आदेश
पिंपरी चिंचवड महापालिका
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 10:36 PM

पिंपरी-चिंचवड : जा गावात गेल्या एक महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळून आला नाही अशा गावांमधील 8वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे शहरातील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंदच राहणार असल्याची माहीत पालिका आयुक्तांनी आज दिलीय. त्यामुळे उद्योगनगरीतील मुलांना अद्यापही ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं तूर्तास पाहायला मिळत आहे. (Schools in Pimpri Chinchwad will remain closed till July 31)

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंदच आहे. अशावेळी मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे. ज्या गावांमध्ये एक महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही अशा गावांमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंद राहणार असल्याचं परिपत्रक पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलं आहे.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि क्लासेस सुरु

पिंपरी-चिंचवडमधील शाळा सुरु होणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तूर्तास ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागणार आहे. मात्र स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि क्लासेस सुरु ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि क्लासेसला सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळावर कलम 144

ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा ज्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी विकेंड लॉकडाऊन सुरु आहे. परंतु नागरिकांना याचं कसलंही भान राहिलं नाहीय. लॉकडाऊन असून देखील नागरिक मोठ्या संख्येने विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. अशात शासन आणि प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात यावी म्हणून विविध प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर आजपासून कलम 144 लागू करण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या :

बीड जिल्ह्यातील 3 तालुक्यात कडक निर्बंध, तालुके कोणते, निर्बंध काय? वाचा सविस्तर

Nashik Corona Update : नाशिकमध्ये सोमवारपासून शाळा सुरु, सर्व कार्यक्रमांवर बंदी, पाणी कपातीचीही भुजबळांची घोषणा

Schools in Pimpri Chinchwad will remain closed till July 31

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.