जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचा राजकोट किल्ल्यावर गोपनीय दौरा, मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत…

Ram Sutar: राम सुतार यांचा राजकोट किल्ला पाहणीचा दौरा प्रशासनने अत्यंत गुप्त ठेवला. राम सुतार राजकोट किल्ल्याची आणि दुर्घटना झालेल्या पुतळ्याची पाहणी करून मुंबईत परतले. आता राज्य सरकारला ते आपला अहवाल सादर करणार आहेत.

जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचा राजकोट किल्ल्यावर गोपनीय दौरा, मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत...
Ram Sutar
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 1:45 PM

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. २६ ऑगस्ट रोजी पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीकडून आंदोलन सुरु आहेत. या प्रकरणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार यांनी माफी मागितली. राज्य शासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन समित्या नियुक्त केली आहे. आता राजकोट किल्ल्यावर जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार पोहचले. त्यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केली. त्यावेळी मोजकेच अधिकारी होते. त्यांचा हा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला.

राम सुतार देणार अहवाल

राम सुतार यांचा राजकोट किल्ला पाहणीचा दौरा प्रशासनने अत्यंत गुप्त ठेवला. राम सुतार राजकोट किल्ल्याची आणि दुर्घटना झालेल्या पुतळ्याची पाहणी करून मुंबईत परतले. आता राज्य सरकारला ते आपला अहवाल सादर करणार आहेत. राम सुतार राजकोट किल्ल्याची पाहणी करत असताना सुद्धा त्यांच्यासोबत मोजकेच अधिकारी उपस्थित होते.

8 हजारांहून अधिक शिल्प घडवली

जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी देशभरात अनेक पुतळे बनवले आहे. गेल्या 70 वर्षांपासून शिल्प बनवत आहेत. 98 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी आतापर्यंत 8 हजारांहून अधिक शिल्प घडवली आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना पहिली ऑर्डर दिली होती. 1947 साली त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बनवण्याचे काम नेहरुंनी दिले होते. सरदार सरोवर धरणाजवळील नर्मदेवरील 522 फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या जगातील सर्वात उंच पुतळा त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी बनवला.

हे सुद्धा वाचा

अयोध्येत बनवलाय जटायू

अयोध्येतील कुबेर टेकडीवर स्थापन करण्यात आलेली 300 फुट उंचीचा राम पितळेचा जटायू राम सुतार यांनी बनवला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक महापुरुषांचे पुतळे त्यांनी बनवले आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज नवा पुतळा उभारण्याचे काम राम सुतारांना दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.
तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?
तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा.