नितेश राणेंच्या भडकाऊ वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीसांकडे दुसरी तक्रार

नितेश राणेंच्या भडकाऊ वक्तव्यावरुन अजित पवारांनी आधी भाजपकडे तक्रार केली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तक्रार गेली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. मुस्लीम समाजात संतापाची भावना असून कारवाई करा, असं सतीश चव्हाण म्हणाले आहेत.

नितेश राणेंच्या भडकाऊ वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीसांकडे दुसरी तक्रार
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 10:50 PM

नितेश राणेंच्या भडकाऊ वक्तव्यावरुन अजित पवारांनीच भाजपकडे तक्रार केली होती. आता पुन्हा त्यांच्याच पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांनी फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. मुस्लीम समाजात संतापाची भावना असून कारवाई करा, असं सतीश चव्हाण म्हणाले आहेत. नितेश राणे यांच्या भडकाऊ भाषणावरुन, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाणांनी थेट फडणवीसांनाच पत्र लिहून कडक कारवाईची मागणी केली आहे. 2 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि स्वत:च्या राजकारणासाठी भाजपचे आमदार नितेश राणे सातत्याने मुस्लीम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.

मुस्लीम समाजात संतापाची भावना असून गुन्हे दाखल होऊनही नितेश राणेंची वक्तव्य सुरुच आहेत. 2 समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. नितेश राणेंवर कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत. तसंच भाजपच्या शिर्ष नेतृत्वानेही समाज विघातक वक्तव्यांची चौकशी करुन करावी. नितेश राणेंचं वक्तव्य महाराष्ट्र किंवा देशातल्या मुस्लिमांविरोधातलं नाही. तर बांगलादेश आणि पाकिस्तानची भाषा, करणाऱ्यांसाठी आहे असं बावनकुळे म्हणाले आहेत. हिंदू जनआक्रोश मोर्चातून नितेश राणे पोलिसांना बाजूला करण्याचं सांगून थेट आव्हान देत आहेत.

अजित दादांचे आमदार सतीश चव्हाणांच्याआधी खुद्द अजित पवारांनीच भाजपच्या नेतृत्वाकडे नितेश राणे, अनिल बोंडे आणि संजय गायकवाडांची तक्रार केली आहे. मात्र अजित पवारांना कोणाकडे तक्रार करायची करु द्या, असं नितेश राणे म्हणत आहेत. अशी भडकाऊ वक्तव्य करुन भाजपला दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत…तर भुजबळांनीही नितेश राणेंना आपल्या मतांवर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्या असा सल्ला दिला आहे.

याआधी अजित दादांनी भाजपच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे. त्यावर अजित पवारांना कुठे तक्रार करायची ती करु द्या असं नितेश राणे म्हणाले होते. अजित पवार यांनी नाव न घेता नितेश राणे यांना फटकारलं होतं. पण तरी देखील नितेश राणेंनी भडकावू भाषण सुरुच होते. एक दिवस पोलिसांना सुट्टी देतो. मुस्लिमांनी ताकद दाखवावी. मग कळेल पुढची सकाळ हिंदू बघतो की मुसलमान अशी चिथावणी नितेश राणेंनी दिली आहे. हिंदू जनआक्रोश मोर्चातून नितेश राणेंचं मशिदीत घुसून मारण्याचं प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.