Nashik: गोंधळ आख्यानानंतर जिल्ह्यात उद्यापासून सुरू होणार माध्यमिकच्या शाळा, बच्चेकंपनीचा उत्साह शिगेला!

नाशिक जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सिन्नर, निफाड तालुक्यातले रुग्ण कमी झालेले नाहीत. जिल्ह्यात जवळपास 500 च्या घरात रुग्णांचा आकडा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे.

Nashik: गोंधळ आख्यानानंतर जिल्ह्यात उद्यापासून सुरू होणार माध्यमिकच्या शाळा, बच्चेकंपनीचा उत्साह शिगेला!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 11:26 AM

नाशिकः दिवाळी सुट्टीनंतर नाशिक जिल्ह्यात उद्या सोमवारपासून माध्यमिकच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जाणार आहे. दुसरीकडे महापालिकेच्या प्राथमिक शाळा 15 नोव्हेंबरपासूनच सुरू झाल्या आहेत. माध्यमिक शाळांची सुट्टी वाढल्यामुळे प्राथमिक शाळांचीही सुट्टी वाढवण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात होते. शाळा सुरू कधी होणार, हे शेवटच्या दिवसांपर्यंत कुणालाही ठाऊक नव्हते.

14 दिवसांच्या सुट्ट्या

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा 4 ऑक्टोबर 2021 पासून ऑफलाईन स्वरुपात सुरू झाल्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एकूण 14 दिवसांची सुट्टीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.

11 पर्यंत गोंधळ

सुट्ट्यांच्या काळात शाळांकडून सुरू असलेले ऑनलाईन अध्यापनही बंद राहील, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले होते. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन दिवाळी सुट्टीची माहिती दिली होती. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. त्यानुसार नाशिकमध्ये जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांना 10 पर्यंत सुटी होती. त्यामुळे त्या 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार होत्या.

अचानक सुट्टी वाढवली

नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी व्ही. एम. कदम यांनी स्वतंत्र परिपत्रक काढून शाळांची सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या शाळांची दिवाळी सुट्टी 20 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. सोबतच 21 नोव्हेंबरला रविवार. त्यामुळे आता हे वर्ग उद्या 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. महापालिकेच्या प्राथमिक शाळा या 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार होत्या. मात्र, माध्यमिकच्या सुट्ट्या वाढवल्याने शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनीही परिपत्रक काढून महापालिका शाळांची सुट्टी वाढवली. त्यामुळे या शाळा 15 नोव्हेंबरपासून सुरू झाल्या.

कोरोना नियमांचे पालन

जिल्ह्यात उद्या माध्यमिकच्या शाळा सुरू होत असल्या तरी कोरोनाबाबतच्या प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सिन्नर, निफाड तालुक्यातले रुग्ण कमी झालेले नाहीत. जिल्ह्यात जवळपास 500 च्या घरात रुग्णांचा आकडा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे.

इतर बातम्याः

Nashik: दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 2 मुले रक्तबंबाळ, उपचार सुरू

Nashik: साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.