संयम बाळगावा, सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळावी, आर्यन खान प्रकरणानंतर उज्ज्वल निकम यांचा तपास यंत्रणांना सल्ला

राज्य किंवा केंद्र सरकारमधील तपास यंत्रणांनी तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे. उगीचच चमकोगिरी म्हणून वाट्टेल तशी निवेदने किंवा सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळायला हवी, असं वक्तव्य ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी दिला.

संयम बाळगावा, सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळावी, आर्यन खान प्रकरणानंतर उज्ज्वल निकम यांचा तपास यंत्रणांना सल्ला
UJJWAL NIKAM
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 4:44 PM

सांगली : राज्य किंवा केंद्र सरकारमधील तपास यंत्रणांनी अतिशय संयम बाळगला पाहिजे. उगीचच चमकोगिरी म्हणून वाट्टेल तशी निवेदने किंवा सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळायला हवी, असा सल्ला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी दिला. क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी तसेच आर्यन खान अटक प्रकरणांनतर एनसबीसारख्या केंद्रीय तपास संस्था प्रसिद्धीच्या झोतात आल्या. ईडी तसेच एनसीबीसुद्धा मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहेत. या पार्श्वभूमीवर निकम यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व आले आहे.

सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळायला हवी

“राज्य किंवा केंद्र सरकारमधील तपास यंत्रणांनी तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे. उगीच चमकोगिरी म्हणून वाटेल तशी निवेदने किंवा सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळायला हवी. तपास यंत्रणांच्या कृत्यामुळे राजकीय नेते तपास यंत्रणावर टीका करायला उद्युक्त होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे,” असे उज्ज्वल निकम म्हणाले.

राजकीय लोकांनी न्यायालयात दाद मागावी

तसेच पुढे बोलताना “राजकीय नेत्यांनी तपास सुरू असताना तपास यंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर कायदा सुव्यवस्थेला हा मोठा धोका आहे, असं म्हणावं लागेल. तपास चुकीचा असेल तर राजकीय लोकांनी न्यायालयात दाद मागावी. पण प्रसारमाध्यमांसमोर आरोप करुन तपास यंत्रणांच्या गुणवतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये,” असे मत निकम यांनी व्यक्त केले.

आर्यन खान प्रकरणात प्रमोद महाजन यांच्या मृत्यूचा दाखला

दरम्यान, यापूर्वी वकील उज्ज्वल निकम यांनी आर्यन खान प्रकरणात महत्त्वाचे कायदेशीर पेच आणि संदर्भ सांगितले होते. त्यांनी दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या खटल्याचा दाखला दिला होता. “आर्यन खान हा व्हिआयपीचा मुलगा आहे, म्हणून त्याला जामीन मिळत नाही अस मी म्हणनार नाही. एनसीबीला आर्यन खानची व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग सापडली आहे. या चॅटिंगमध्ये जे तथ्य आहेत किंवा जे पुरावे आहेत त्याचा आधार घेत आर्यनचा जामीन नकारला गेला आहे. व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग ग्राह्य धरायची की नाही हे कोर्टात निश्चित होणार,” असे निकम यांनी सांगितले होते. तसेच पुढे बोलताना त्यांनी प्रमोद महाजन यांच्या मृत्यूचाही दाखला दिला होता. “प्रमोद महाजन त्यांचा भाऊ प्रविण महाजन याने त्यांना एक मेसेज पाठविला होता. त्याच मेसेजचा आधार घेत त्याच्यावर आरोप केला होता. नंतर कोर्टात त्या मेसेजचा संदर्भ सिद्ध करावा लागला. म्हणून एनसीबीला मुंबई हायकोर्टात आर्यन खान प्रकरणात व्हॉट्सअॅप चॅटिंग संदर्भातील दावा सिद्ध करावा लागणार आहे. त्याचबरोबर आर्यन खानचे वकीलदेखील आपली बाजू मंडणार आहेत,” असे निकम म्हणाले होते.

इतर बातम्या :

हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा ! सरकारी परिपत्रकात औरंगाबादचं संभाजीनगर होताच इम्तियाज जलील भडकले

VIDEO: तुझी मर्जी म्हणजे तुझा अधिकार होऊ शकत नाही, हे विधी तज्ज्ञांनी सांगितलं पाहिजे; उद्धव ठाकरेंचा नाव घेता केंद्रावर जोरदार हल्ला

50 हजार गुंतवून सुरु करा ‘हा’ व्यवसाय, सरकारकडून मिळणार आर्थिक मदत; महिन्याला लाखो रुपये कमावण्याची संधी

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.