आस्मानी संकटानंतर आता शेतकऱ्यांसमोर सुलतानी संकट, अधिवेशनापूर्वीच देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
प्रत्येक अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न हे केंद्रस्थानी हे राहिलेले असतात. आता उद्यापासून सुरु होत असलेल्या अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच विरोधी पक्ष हा सरकारला धारेवर धरणार असल्याचे संकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिले आहेत. शेतकऱ्यांप्रती सरकारची भूमिका ही अहंकाराची आहे. ज्या बळीराजामुळे आज आपण प्रतिनिधीत्व करीत आहोत याची जाणीव तरी सरकारने ठेवायला पाहिजे. गेल्या दोन वर्षापासून शेतकरी हा आस्मानी संकटाशी दोन हात करीत आहे.
मुंबई : प्रत्येक अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न हे केंद्रस्थानी हे राहिलेले असतात. आता उद्यापासून सुरु होत असलेल्या राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच विरोधी पक्ष हा सरकारला धारेवर धरणार असल्याचे संकेत विरोधी पक्षनेते (Devendra fadnavis) देवेंद्र फडणवीस दिले आहेत. शेतकऱ्यांप्रती (State Government) सरकारची भूमिका ही अहंकाराची आहे. ज्या (Farmer) बळीराजामुळे आज आपण प्रतिनिधीत्व करीत आहोत याची जाणीव तरी सरकारने ठेवायला पाहिजे. गेल्या दोन वर्षापासून शेतकरी हा आस्मानी संकटाशी दोन हात करीत आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे सोडून वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. शिवाय कालावधी संपूनही ऊस अजून फडातच आहे. अशा एक ना अनेक सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असून यावर विरोधी पक्ष संघर्ष करणार असल्याचे फडणवीस यांनी अधिवेशनाच्या अनुशंगाने झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
महाआघाडी सरकारला आश्वासनांचा विसर
सत्ता स्थापन होताच महात्मा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली होती. दोन वर्षानंतरही अनेकांना या योजनेचा लाभ झालेला नाही. एवढेच नाही तर जे शेतकरी नियमित कर्ज अदा करीत होते त्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याचे राज्य सरकारने कबूल केले होते. पण याचा विसर पडला असून या सरकारवरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे. तर दुसरीकडे वीज पुरवठा खंडीत केला जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले होते. पण त्यांच्या म्हणण्याला आता अधिकचे महत्व राहिलेले नाहीत. त्यामुळेच उर्जा मंत्री हे विद्युत पुरवठा खंडीत होणारच असल्याचे सांगत आहेत. निर्णयामध्ये एक वाक्यता नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
उभ्या ऊसाचे करायचे काय?
ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. असे असताना पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. राज्य सरकारचे योग्य नियोजन नसल्यामुळेच शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन देखील ऊसाचे गाळप झालेले नाही. त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. ऊसाचे वजन घटणार असून याला जबाबदार हे सरकारच असल्याचा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.
खरीपाचे नुकसान निसर्गामुळे अन् रब्बीचे सरकारमुळे
खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली होती. मात्र, अधिकच्या पावसाचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार होता. मुबलक पाणी असतानाही केवळ वीज पुरवठा होत नसल्याने पिके करपून जात आहेत. कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. एखाद्या स्पर्धेप्रमाणे कनेक्शन कट करण्याचा पराक्रम सध्या सुरु आहे. हे सावकारी सरकार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
संबंधित बातम्या :
Photo: हौसेला नाही मोल..! गायीच्या डोहाळे जेवणात गावाचा सहभाग, संस्कृतीचे जतन अन् वेगळेपणही
ठरलं तर मग, व्यापारी अन् शेतकऱ्यांच्या बैठकीत पपई दराचा निर्णय, टिकणार की मोडणार..!
विलासराव देशमुख अभय योजनेमुळे थकबाकीदार वीज ग्राहकांना मिळणार ‘उर्जा’, नेमका फायदा काय?