शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या शाही विवाहात राष्ट्रवादीची चर्चा, अजितदादा अन् जयंत पाटील यांच्यात…

shambhuraj desai son wedding | शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नात राजकीय भेटीगाठी झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संवाद साधला. लग्नात राष्ट्रवादीमध्ये कधीकाळी सोबत काम करणारे नेते जयंत पाटील आणि अजित पवार सामोरासमोर आले. पण...

शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या शाही विवाहात राष्ट्रवादीची चर्चा, अजितदादा अन् जयंत पाटील यांच्यात...
शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या शाही विवाह सोहळा
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 10:45 AM

भूषण पाटील, सातारा, दि.29 जानेवारी 2024 | साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाचे लग्न रविवारी झाले. या शाही लग्नात राज्यातील आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आले. साताऱ्यामधील पाटणच्या दौलतनगर येथील कसबे मरळी येथे 50 ते 55 एकरांत गोरज मुहूर्तावर विवाह लागला. या शाही लग्नाची सर्वत्र चर्चा झाली. परंतु या लग्नातील राजकीय नाट्याची चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाची किनार लग्नात दिसून आली. शाही लग्नाची चर्चा होत असताना राजकीय नाट्य दिसून आले.

राजकीय भेटीगाठी पण या भेटी नाहीच

शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नात राजकीय भेटीगाठी झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या जवळ जात विचारपूस केली. लग्नात राष्ट्रवादीमध्ये कधीकाळी सोबत काम करणारे नेते जयंत पाटील आणि अजित पवार सामोरासमोर आले. मात्र त्यांनी एकमेकांशी बोलणे टाळले. अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यामधील अबोला लग्न समारंभात दिसून आला. त्याची चर्चा लग्नानंतर होत राहिली. लग्नात संभाजी राजे छत्रपती यांना देखील एकनाथ शिंदे आणि आग्रहाने जवळ बसवून घेतले होते.

70 हजार लोकांच्या जेवणाची सोय

आमदार शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज यांचा विवाह धाराशिव जिल्ह्यातील राजे-निंबाळकर घराण्यातील डॉक्टर वैष्णवीराजे हिच्याशी झाला. वैष्णवी निंबाळकर यांनी एमबीबीएस केलंय. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची जबाबदारी यशराज यांच्यावर आहे.

हे सुद्धा वाचा

या लग्नात अनेक मोठे नेते आले होते. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आले. तसेच देसाई यांचे मंत्रीमंडळातील अनेक सहकारी होते.  लग्नसोहळ्यासाठी परिसरातील अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे 70 हजार लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. 65 बसेसमधून लग्नासाठी वऱ्हाड आणण्याची सोय करण्यात आली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.