Shankarrao Gadakh : मंत्री शंकरराव गडाख यांना मुलासह जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ
मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, माझ्या विरोधात खोट्या-नाट्या केस दाखल करून आरोप करण्याचे प्रकार सुरू आहेत. माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल शिवराळ भाषा वापरली जाते. नेवासा तालुक्यातील राजकारण खालच्या स्थरावर चालले आहे. मात्र, मला पोलिसांवर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.
अहमदनगरः जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्यासह पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे परवा रात्री गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे (Rahul Rajale) यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर हा प्रकार समोर आलाय. सध्या राजळे यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, हा राजळे यांच्यावर झालेला हल्ला नसून, तो माझ्यावर झालेला हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी दिलीय. घोडेगाव येथे रात्री राजळे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेत राजळे हे जखमी झाले आहेत. अचानक गोळीबार झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. हा हल्ला का करण्यात आला, त्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. हल्ल्यात जखमी झालेल्या राजळे यांच्यावर अहमदनगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना आता पुण्याला हलवण्यात आले आहे.
खालच्या पातळीवर राजकारण
राहुल राजळे यांच्यावर परवा रात्री गोळीबार झाला होता. त्यातच जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा राहुल राजळेवर हल्ला नसून, माझ्यावर झालेला हल्ला आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. असे काही होईन असे माझ्या मनात ही नव्हते. काही दिवसांपासून खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे, असा आरोप गडाख यांनी केला आहे.
शिवराळ भाषेचा वापर
गडाख पुढे म्हणाले की, माझ्या विरोधात खोट्या-नाट्या केस दाखल करून आरोप करण्याचे प्रकार सुरू आहेत. माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल शिवराळ भाषा वापरली जाते. नेवासा तालुक्यातील राजकारण खालच्या स्थरावर चालले आहे. मात्र, मला पोलिसांवर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. ते नक्कीच आरोपींना शोधून काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, आधी हल्ला आणि त्यानंतर क्लिप व्हायरल झाल्याने नगर जिल्ह्याची वाटचाल नेमकी कोठे सुरू आहे, अशा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!