पवारांचा आपल्याच लोकांवर अविश्वास, तर राऊत राष्ट्रवादीचा भोंगा; मनसेतून देशपांडेंचे उत्तर
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊत हा राष्ट्रवादी भोंगा आहे. बाळासाहेब यांच्याकडे निष्ठावंत लोक होते. शिवसेनेकडे आता निष्ठावंत नाहीत म्हणून ते अल्टिमेटम देऊ शकत नाहीत.
मुंबईः शरद पवार (Sharad Pawar) हे जेम्स लेनच्या वक्तव्यावर विश्वास ठेवतात. मात्र, आपल्या लोकांवर अविश्वास दाखवतात आणि राष्ट्रवादीचे (NCP) हेच नेते हे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेसाठी मागणी करत होते, अशी आठवण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी करून दिली. आज शरद पवारांनी राज ठाकरे यांनी उत्तरसभेत केलेल्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, जेम्स लेनचं गलिच्छ लिखाण हे बाबासाहेब पुरंदरेंच्याच माहितीवर आधारित होते. आपण जे लिखाण केलं, त्याची माहिती पुरंदरेंकडून घेतल्याचं लेन यांनी म्हटलं. जेम्स लेनने हे उघड सांगूनही पुरंदरे यांनी त्याचा खुलासा केला नाही. त्यामुळे मी पुरंदरेंवर टीका केली असेल, तर मला त्याचं दुःख नाही, तर अभिमान वाटतो. त्यामुळे यावर कुणी काय म्हटलं असेल, तर मला त्याबद्दल काही सुचवायचे नाही, असा उल्लेखही केला. हाच संदर्भ पकडत संदीप देशपांडे यांनी पवार आपल्या लोकांवर अविश्वास दाखवत असल्याचा आरोप केला. शिवाय सुप्रिया सुळे यांनी महागाई कोणत्या मुद्यावर भाष्य करावे. तुम्ही फक्त पैसे खाण्यासाठी आहेत का? लोकसभेत फक्त ईडीच्या प्रश्नावर बोलता, असा टोला हाणला.
आव्हाडांनी तोंड बंद ठेवावे…
संदीप देशपांडे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी तोंड बंद ठेवावे. त्यांनी राजकीय टिपण्णी करावी, पण वैयक्तिक बोलू नये. नाहीतर आम्ही ही येऊर च्या गोष्टी बाहेर काढू. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे पुरवठा मंत्री आहेत. राष्ट्रवादीचे हे केष्टो मुखर्जी असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. मुख्यमंत्री दोन वर्षांनंतर मंत्रालयात आले. पेढे वाटले पाहिजेत. रोषणाई केली पाहिजे. महाराष्ट्राला ही आश्चर्य वाटले असेल आज.
आदित्यवर गुन्हा दाखल करणार का?
संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. अनेक लोक तलवारी सभेत दाखवतात. आदित्य ठाकरे यांनी ही शिवाजी पार्कात राजकारणात प्रवेश केला, तेव्हा तलवार दाखवली होती. मग त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करणार का, असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, आमचा पक्ष संपलेला म्हणता, मग शरद पवार ते बाकीचे सर्व का बोलताय.
राऊत राष्ट्रवादीचा भोंगा…
संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊत हा राष्ट्रवादी भोंगा आहे. बाळासाहेब यांच्याकडे निष्ठावंत लोक होते. शिवसेनेकडे आता निष्ठावंत नाहीत म्हणून ते अल्टिमेटम देऊ शकत नाहीत. शिवराळ भाषेवर आक्षेप आहे ती कुणालाही बोलू नये. संजय राऊत यांनी कारकुनी करावी. त्यांना ईडीची नोटीस आल्याने त्यांची धांदल उडालीय.
इतर बातम्याः