आता अजित पवार मुख्यमंत्री होतील म्हणून त्यांना त्रास दिला जातोय का? चर्चेतला सवाल पवारांनी रोखठोक निकाली काढला
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. सरकार कधीही कोसळू शकते या चर्चेप्रमाणेच उरलेली अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार अशीदेखील चर्चा रंगते. उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी काळात मुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगत आलेली आहे. या सर्व मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखठोक भाष्य केलं आहे.
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. सरकार कधीही कोसळू शकते या चर्चेप्रमाणेच उरलेली अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार अशीदेखील चर्चा रंगते. उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी काळात मुख्यमंत्री होतील असा अंदाज नेहमी बांधला जातो. मात्र या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखठोक भाष्य केलं आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे नेतृत्व पूर्ण पाच वर्षे शिवसेनेकडेच राहील असं आज स्पष्टपणे सांगितले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेचा सोक्षमोक्ष लावला आहे.
सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडेच राहणार
शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत. त्याच भीतीमुळे भाजप त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिलं. राष्ट्रवादी, शिवसेना आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून हे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे असेल ही गोष्ट सर्वांनी एकमताने मान्य केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या ठिकाणी दुसरा कोणी व्यक्ती येण्याचा प्रश्न नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.
काही लोकांच्या डोक्यात सत्तेची गुर्मी भरपूर आहे
तसेच पुढे बोलताना त्यांनी लखीमपूर खेरी हिंसाचार तसेच शेतकरी मृत्यूवर बोलताना केंद्र सरकारला लक्ष्य केलं. मी दिल्लीत होतो. तिथे मी काही लोकांशी भेटलो. सत्तेची गुर्मी काही लोकांच्या डोक्यात भरपूर आहे. ज्यांनी गाडी चालवली त्याचे वडील केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की गंभीर गोष्ट घडल्यानंतर तसेच हत्तेचा आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यायला हवा होता. पण सत्तेचा दर्प एवढा आहे. आम्ही काही वाट्टेल ते करू आम्ही सत्ता सोडणार नाही, हा उन्माद दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. पण जनता त्याला वेळोवेळी उत्तर देईल, असा घणाघात शरद पवार यांनी केला.
इतर बातम्या :
Mumbai Drugs Case : नवाब मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडेंचं ‘सत्यमेव जयते’ !
भरधाव पिकअप बॅरिकेट्स तोडून थेट दुकानात शिरली, एकाचा मृत्यू, दुकानाचं प्रचंड नुकसान
मुंबई पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली, काँग्रेसच्या स्थापनादिनी राहुल गांधींना शिवाजी पार्कवर येण्याचे निमंत्रणhttps://t.co/ee8el9Gq76#rahulgandhi | #Congress | @BhaiJagtap1 | @INCMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021
(sharad pawar comment on maha vikas aghadi government said next cm of maharashtra will be only of shivsena)