Sharad Pawar in Osmanabad | ‘निकालाआधीच मी येणार असं सांगत होते, पण मी पुन्हा येऊ दिलं नाही’
संकटकाळात राजकारण आणायचं नसतं. ते कुठेही राजकारण (Politics) करतात. निकालाआधीच मी येणार असं सांगत होते, पण मी येऊ दिल नाही, असा टोला शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे.
संकटकाळात राजकारण आणायचं नसतं. काही लोकांना जमत नाही, ते कुठेही राजकारण (Politics) करतात. निकालाआधीच मी येणार असं सांगत होते, पण मी येऊ दिल नाही, असा टोला शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त आज उस्मानाबाद दौऱ्यावर होते. शरद पवार यांनी येथील कार्यक्रमात बोलताना विविध मुद्यावर भाष्य केलं. ही आघाडी यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करतेय, असं शरद पवार म्हणाले. शिवछत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभं केलं, देशात अनेक राज्य झाली, कुठे मोगल झाले पण छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, असं शरद पवार म्हणाले.
Latest Videos