फडणवीस म्हणाले महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, पवारांनी थेट बंगाली बोलून दाखवलं, नेमकं काय म्हणाले ?
शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समचार घेतला आहे. फडणीस यांनी थेट बंगाली भाषा बोलून दाखवली आहे. .
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पिपंरी चिंचवड दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकार तसेच राज्यातील भाजप नेते यांच्यावर सडकून टीका केली. तसेच महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही असे वक्तव्य करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचादेखील समचार घेतला. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी थेट बंगाली भाषा बोलून दाखवली आहे.
महाराष्ट्र आणि बंगाल राज्य नेहमी एकत्र
“महाराष्ट्राचा बंगाल म्हणजे काय. पश्चिम बंगाल हे देशाचे महत्त्वाचे राज्य आहे. देशाचा इतिहास, स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला तर पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल हे राज्य नेहमी एकत्र असतात. राष्ट्रगीतातही हे तीन राज्य एकत्र आहेत. महाराष्ट्राचा बंगालशी संबध अत्यंत जवळचा आहे. बंगाली आणि मराठी भाषा अत्यंत जवळची आहे. स्वातंत्र्यलढ्यात बंगालमधील रविंद्रनाथ टागोर तसेच सुभाषचंद्र बोस यांनी जे योगदान दिलं तेच योगदान लोकमान्य टिळक तसेच तत्सम नेतृत्वाने दिलं. हा महाराष्ट्र आणि बंगालचा इतिहास आहे,” असे शरद पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना मराठी आणि बंगाली भाषेतील साम्य सांगण्यासाठी ‘मला बंगाली भाषेत बोलता येत नाही’ या वाक्याला बंगाली भाषेत कसं म्हणावं हेसुद्धा त्यांनी सांगितलं.
टागोर, बोस यांच्यासारखे नेतृत्व महाराष्ट्रात होऊ द्यायचे नाही ?
तसेच पुढे बोलताना मी दोन ते तीन दिवस बंगालमध्ये राहिलो तर मलासुद्धा बंगाली भाषा समजेल. बंगालमधील रविंद्रनाथ टागोर तसेच शुभाषचंद्र बोस यांच्यासारखे नेतृत्व तसेच कवी फडणवीस यांना महाराष्ट्रात होऊ द्यायचे नाहीत का ? असा सवालदेखील त्यांनी फडणवीस यांना केला.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ?
नागपूरमध्ये बोलताना फडणवीस यांनी महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. “मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. यूनियनबाजी आणि खंडणीने बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही. कोलकाताची आजची व्यवस्था काय आहे हे माहीत आहे का? जो तुमच्या विरोधात बोलेल त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकावयाचं आहे का? जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. जोपर्यंत भाजप जिवंत आहे. तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. काय वाटेले ते करू पण महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही,” असा इशारा फडणवीस यांनी 16 ऑक्टोबर रोजी बोलताना दिला.
इतर बातम्या :
महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर, आयकर विभागाच्या कारवाईवरुन पवारांचा घणाघात
(sharad pawar criticizes devendra fadnavis on maharashtra and west bengal comment )