Sharad Pawar On Raj Thackeray : शरद पवार नास्तिक आहेत? राज ठाकरेंच्या आरोपावर पवार म्हणाले, माझे आदर्श प्रबोधनकार ठाकरे, आरसा दाखवला!
Sharad Pawar On Raj Thackeray : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे नास्तिक आहेत. ते कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. ते फक्त फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेतात, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. राज यांच्या या आरोपाचं खंडन करतानाच शरद पवार यांनी त्यांना आरसा दाखवला.
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar)हे नास्तिक आहेत. ते कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. ते फक्त फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेतात, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केली होती. राज यांच्या या आरोपाचं खंडन करतानाच शरद पवार यांनी त्यांना आरसा दाखवला. आपण नास्तिक आहे की नाही हे सांगताना माझ्या धर्माचं मी प्रदर्शन करत नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे (prabodhankar thackeray) माझे आदर्श आहेत. देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रबोधनकारांनी टीका केली. गैरफायदा घेणाऱ्या घटकाला ठोकून काढण्याचां काम प्रबोधनकारांनी केलं, असं त्यांनी सांगितलं. आम्ही प्रबोधनकारांचं लिखाण वाचतो. कुटुंबातील लोकं वाचत असतीलच असं नसाव. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असा टोला पवारांनी लगावला.
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या सर्व आरोपांचं खंडन केलं. माझा धर्म आणि देव याचं मी प्रदर्शन करत नाही. मी निवडणुकीत देवधर्म आणत नाही. मी एकाच मंदिरात जातो. बारामतीत. त्याचा मी गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे काही आदर्श आहेत. प्रबोधनकार ठाकरे हे माझे आदर्श आहेत. त्याचं लिखाण वाचलं तर त्याचं सविस्तर मार्गदर्शन होईल. देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रबोधनकारांनी टीका केली. गैरफायदा घेणाऱ्या घटकाला ठोकून काढण्याचां काम प्रबोधनकारांनी केलं. आम्ही प्रबोधनकारांचं लिखाण वाचतो. कुटुंबातील लोकं वाचत असतील असं नसाव. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असा टोला पवारांनी लगावला.
त्यांच्या भाषणातून करमणूक होते
हा पक्ष संपणारा पक्ष आहे. असं ते म्हणतात. त्याची नोंद महाराष्ट्रातील लोकांनी घेतली. त्यामुळे लोकांनी त्यांना एकही जागा दिली नाही. त्यांच्या सभा मोठ्या होतात. त्यात शिवराळपणाची भाषा असते. नकला असतात. करमणूक होते म्हणून लोक जातात, असा चिमटाही त्यांनी काढला.
सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रश्न
सुरुवातीला सांगितलं खरा प्रश्न बेरोजगारी आणि महागाईचा आहे. पण महाराष्ट्रात जे वातावरण तयार करायचं आहे. सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न दिसतो. सांप्रदायिक विचाराला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे. काही लोक सांप्रदायिक विचाराची मांडणी करण्याचं काम काही लोक करत आहे. राज्याची शांतता भंग करण्याचं काम करत आहे. लोकांनी त्याला बळी पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
संबंधित बातम्या: