पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त दोनच लोकांवर बोलतात, एक म्हणजे… शरद पवार यांनी नावेच सांगून टाकली

गेल्या आठवड्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलं आहे. एका दिवसात तीन तीन सभांना मोदी संबोधित करत आहेत. यावेळी विरोधकांवर जोरदार टीकाही करत आहेत. खासकरून माजी मंत्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नरेंद्र मोदी टीका करताना दिसत आहेत. या टीकेला आज शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त दोनच लोकांवर बोलतात, एक म्हणजे... शरद पवार यांनी नावेच सांगून टाकली
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 5:43 PM

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काल त्यांनी माझ्यावर टीका केली. पंतप्रधान दोनचं लोकांवर बोलतात. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरं उद्धव ठाकरे. मी 45 वर्ष महाराष्ट्रमध्ये फिरतोय. माझी लोकं आहेत, तो माझा अधिकार आहे. पण त्यावरूनही मोदींनी आमच्यावर टीका केली, असं शरद पवार म्हणाले. आम्ही शेतीमालाच्या किंमती वाढवल्या असं ते म्हणतात. दहा वर्षापासून सत्तेत ते आहेत. किंमती आम्ही कश्या काय वाढवल्या? असा सवालही शरद पवार यांनी केला.

मी बऱ्याच वर्षांनी आलो आहे. सर्व जण विविध राजकीय भूमिका लोकांसमोर मांडतायत. तो लोकशाहीचा अधिकार आहे. बाकीच्या राज्यांच्या निवडणूका एका दिवसात घेतल्या. मात्र महाराष्ट्रची एकूण 48 खासदारांची निवडणूक 4 टप्प्यात कशी? असा सवाल शरद पवार यांनी केला.

सिलिंडरला नमस्कार करून जा

भाषणात देशाच्या पंतप्रधानांनी दोन गोष्टी करायच्या असतात. एक उद्याच चित्र कसं असणार हे सांगायचं असतं. पण मोदी ते करत नाहीत. मनमोहन सिंग यांचं राज्य होत तेव्हा ते महागाईबद्दल बोलायचे. ते 50 दिवसात पेट्रोलचे दर कमी करणार होते, 10 वर्ष मोदींचं राज्य आहे आज किती दर आहे पेट्रोलचा? सिलेंडरचा किती आहे?. मतदानाला जाताना सिलेंडरला नमस्कार करून जा. मोदींनी वस्तूस्तिथी सांगितली पाहिजे. ते ती सांगत नाहीत, असा हल्लाच त्यांनी चढवला.

मोदींच्या आशीर्वादानेच…

आज सर्वत्र भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर करणं ही भूमिका आजच्या सरकारची आहे. विरोधी माणूस, विरोधात कामं करणाऱ्याला तुरुंगात टाकायचं कामं मोदींच्या आशीर्वादाने चालू आहे. लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार आहे. अरविंद केजरीवालांनी दिल्लीत क्रांती केली. अतिशय चांगला माणूस. चुकीचं असेल तिथे टीका करणं हा केजरीवाल यांचा स्वभाव आहे. त्यांनी टीका केली आणि त्यांना तुरुंगात टाकलं. याचं अर्थ हे राज्य लोकशाही सोडून हुकूमशाहीकडे चाललं आहे, असं पवार म्हणाले. त्यांनी इंदिरा गांधी यांच्यासह अनेकांवर टीका केली, आज राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.