मोठी बातमी! उद्धव ठाकरेच महाराष्ट्रात मविआचा चेहरा राहणार? शरद पवार यांचे संकेत काय?

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा चेहरा कोण असेल? याबाबत शरद पवार यांनी मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनी मांडलेलं मत काँग्रेसला मान्य असेल का? ते देखील महत्त्वाचं असणार आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेच महाराष्ट्रात मविआचा चेहरा राहणार? शरद पवार यांचे संकेत काय?
शरद पवार आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 21, 2024 | 9:29 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार? याबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीत खलबतं सुरु आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रमुख चेहरा कोण असेल? याबाबतही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खल सुरु आहेत. महायुतीचा प्रमुख चेहरा कोण असेल? याबाबत महायुतीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या मते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीचा प्रमुख चेहरा असावेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाला अजित पवार तर शिवसेना शिंदे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचा प्रमुख चेहरा असावा, त्यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवावी, अशी इच्छा आहे. महायुतीचा प्रमुख चेहरा असेल ते अजून स्पष्ट होणं कठीण असलं तरी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख चेहऱ्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. “आम्हाला राज्यात परिवर्तन आणायचं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनाने सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी सांगितली लोकसभेची आठवण

“जनमानस वेगळा होता. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची 4 आणि काँग्रेसची केवळ 1 लोकसभेची जागा होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक झाली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत लोकसभेच्या 48 पैकी 31 जागा महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिल्या. महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवे होते”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“आता विधानसभा निवडणूक आहे. ठिकठिकाणी सहकारी भेटत आहेत. अंदाज घेत आहेत. ठिकठिकाणी हेच चित्र दिसत आहे. लोकांना बदल पाहिजे. एखाददुसरा गंभीर प्रसंग आला, तर लोकांची प्रतिक्रिया किती तीव्र असते, याचे उदाहरण काल ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे पाहिले. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात. याचा अर्थ लोकांमध्ये खूप अस्वस्थता आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“एनसीपी, काँग्रेस, शिवसेनेने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. लोकं साथ देतील. लोकांच्या मनात काम करणारे जाणकार त्यांच्यासाठी पक्ष शोधत आहेत. दोन महिने हातात आहेत. त्याचा उपयोग परिवर्तनासाठी करा. शेवटच्या माणसापर्यंत जा, आपली विचारधारा पटवून द्या”, अशी सूचना शरद पवार यांनी दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.