Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात मध्यावधी निवडणूका लागणार का ? शरद पवार यांनी सांगितलेला अंदाज काय ?

राज्यातील राजकारणात उद्धव ठाकरे यांच्यासहित संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरुन उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. विविध पक्षातील नेतेही यावर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

राज्यात मध्यावधी निवडणूका लागणार का ? शरद पवार यांनी सांगितलेला अंदाज काय ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 3:53 PM

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये ( Supreme Court ) राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दादेखील प्रलंबित आहे. त्यासोबतच केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरच हल्लाबोल केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर बोलत असतांना उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं होतं. त्यामध्ये उद्धव ठाकरे राज्यांमध्ये मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या याच विधानावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे म्हणताय म्हणजे काहीतरी तथ्य असेल असेही म्हंटले आहे.

त्यावरून राज्यातील राजकारणात उद्धव ठाकरे यांच्यासहित संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरुन उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. विविध पक्षातील नेतेही यावर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

राज्याच्या राजकारणात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे का ? असा प्रश्न राजकारणातील जेष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांनाही विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विधानाची एकप्रकारे हवाच काढून टाकली आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कशाच्या आधारे हे वक्तव्य केलं हे मी जाणून घेतलेलं नाही. पण मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील असं मला वाटत नाही. एकूणच उद्धव ठाकरे यांची शक्यता शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे.

दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. अनेकदा शरद पवार बोलत असतात त्या उलट घडत असतं असं म्हंटलं जातं, त्यामुळे शरद पवार यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.

सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झालेला नाही. सुनावणी सुरू असतांना आत्तापर्यन्त फक्त ठाकरे गटाने बाजू मांडली आहे. त्यामध्ये पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यात शिंदे यांचे वकिल बाजू मांडणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासहित सोळा आमदार अपात्र झाले तर राज्यात कोणती राजकीय परिस्थिती निर्माण होईल. राजकीय समीकरण बदलणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला खरंतर मध्यावधी निवडणुकीवरुन उत आला आहे.

पुण्यातील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित झाले होते. त्यावेळी बोलत असतांना उद्धव ठाकरे यांनी ही शक्यता वर्तवली होती. आणि त्यावर शरद पवार यांनी भाष्य केल्यानं नवी चर्चा आता सुरू झाली आहे.

राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी.
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल.
फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं
फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं.
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल.
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं.
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप.
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं.
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार.
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा.
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी.