खडसेंची भाजपने दखल घेतली नाही; राजकीय निर्णय काय घ्यावा तो त्यांचा प्रश्न: पवार
खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असं राजकीय वातावरण सध्या राज्यात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
तुळजापूर : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्याच्या बातम्यासुद्धा चर्चिल्या जात आहेत. अशात खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असं राजकीय वातावरण सध्या राज्यात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. (Sharad Pawar reaction on bjp leader Eknath Khadse NCP entry)
खडसेंची भाजपने दखल घेतली नाही, पण काय तो राजकीय निर्णय त्यांनी घ्यावा असं वक्तव्य शब्दात शरद पवारांनी यांनी केलं आहे. ते म्हणाले की, ’20 वर्षात विरोधात असताना एकनाथ खडसे हे सर्वात प्रभावी होते. मात्र, त्याची नोंद भाजपने घेतली नाही. मला सोडून गेलेले काही संपर्कात आहेत. मात्र, परत घेताना निकष आहेत. उस्मानाबादमध्ये सोडून गेलेल्या नेत्यांना आता राष्ट्रवादीत एन्ट्री नाही, आहे तिथे सुखाने राहा’ असं थेट विधान पवारांनी केलं आहे.
खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘खडसे विरोधी पक्ष नेते होते तेव्हा ते आक्रमक आणि खूप सक्रिय होते. त्यांचं कर्तव्य मोठं आहे. राजकीय निर्णय काय घ्यावा तो त्यांचा प्रश्न आहे. पण 20 वर्षात विरोधात असताना खडसे सर्वात प्रभावी होते. मात्र, आता भाजपने त्यांनी नोंद घेतली नाही. त्यामुळे जिथे नोंद घेतली जाते तिथे जावे असे कदाचित खडसे यांना वाटत असावं’
दरम्यान, यावेळी बोलताना डॉ. पदमसिंह पाटील आणि आमदार राणाजगजीतसिंह यांचं नाव न घेता पवार यांनी वक्तव्य केलं आहे. पक्ष स्थापनेपासून सोबत असलेले व नातेवाईक असलेले डॉ पदमसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणा यांनी ऐन निवडणुकीत पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पवार वयक्तिकरित्या खूप दुखावले होते. पवारांच्या या वक्तव्याने पाटील परिवारासाठी राष्ट्रवादी पुन्हा प्रवेशाची दारे कायमची बंद झाली आहेत. राणा पाटील हे सध्या तुळजापूर मतदार संघाचे भाजप आमदार आहेत.
इतर बातम्या –
पुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’
अतिवृष्टी ते राजकारण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
Mumbai | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर नाही, केवळ घोषणा करतं : देवेंद्र फडणवीस – tv9 @Dev_Fadnavis pic.twitter.com/uVxnpOM1xT
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
(Sharad Pawar reaction on bjp leader Eknath Khadse NCP entry)