वेळ नेहमीच अनुकूल नसते, सतेज पाटलांचं ‘आमचं ठरलंय’ पवारांच्या जिव्हारी

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात लावलेले ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनचे बोर्ड चांगलेच जिव्हारी लागले आहेत. सतेज पाटलांच्या ‘आमचं ठरलंय’ या जाहिराती सर्वत्र लागल्या आहेत. तुम्ही ठरवलंय तर मी सुद्धा कधी विसरणार नाही, अशी थेट भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. ते टीव्ही 9 मराठीच्या प्रचार पॅटर्न […]

वेळ नेहमीच अनुकूल नसते, सतेज पाटलांचं 'आमचं ठरलंय' पवारांच्या जिव्हारी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात लावलेले ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनचे बोर्ड चांगलेच जिव्हारी लागले आहेत. सतेज पाटलांच्या ‘आमचं ठरलंय’ या जाहिराती सर्वत्र लागल्या आहेत. तुम्ही ठरवलंय तर मी सुद्धा कधी विसरणार नाही, अशी थेट भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. ते टीव्ही 9 मराठीच्या प्रचार पॅटर्न या कार्यक्रमात बोलत होते.

मी विसरणार नाही सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेबद्दल शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर पवार म्हणाले, “सतेज पाटील आज विधीमंडळात गेलेत. त्यांना मतांचा पाठिंबा राष्ट्रवादीचा मिळाला नसता, तर ते निवडून आले नसते. मतदान मागण्यासाठी आमच्याकडे येतात. आमची मदत घेतात. काँग्रेसने त्यांना मंत्री केलं. आता काँगेस- राष्ट्रवादी संघर्षात असताना स्वत:चे राग घेऊन बसतात. आणि सांगतात आम्ही ठरवलंय. चांगली गोष्ट आहे. वेळ नेहमीच अनुकूल राहते असं नाही. आज ना उद्या सार्वजनिक जीवनात जे राहतात, त्या सगळ्यांना अशा पद्धतीने कुणी काही गमती केल्या, तर त्यांना उत्तरे देणारेही असतात. जसं काही ठरवतात, मी जाहिरात पाहिली की आम्ही ठरवलंय, तर मी सुद्धा काही विसरणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

एकंदरीत शरद पवार यांच्या सतेज पाटलांची ‘आमचं ठरलंय’ ही जाहिरात चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसतं.

दरम्यान, शरद पवार यांनी सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र सतेज पाटील यांनी पवारांची भेटच घेतली नाही. सतेज पाटील यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मदत करुनही धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळेच सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात विस्तवही जात नाही. असं असताना शरद पवार हे दोघांमधील दुरावा दूर करण्याच्या प्रयत्नात होते, मात्र सतेज पाटलांचं कॅम्पेन त्यांच्या भलतंच जिव्हारी लागल्याचं दिसून येतं.

संबंधित बातम्या

पवारांचं सतेज पाटलांवर कागलमध्ये भाष्य नाही, मात्र हातकणंगलेत जाऊन टीका  

मुन्ना-बंटीमध्ये समेट घडवणं शरद पवारांनाही अशक्य!  

मदत नाही तर नाही, विरोध तर करु नका, धनंजय महाडिक हतबल  

ज्यांच्या मनधरणीसाठी जयंत पाटील कोल्हापुरात, ते सतेज पाटीलच जिल्ह्याबाहेर!  

बंटी-मुन्ना वाद मिटवण्यात वेळ घालवणार नाही: हसन मुश्रीफ  

VIDEO : एक बार मैने डिसिजन लिया, तो मैं किसीं की नहीं सुनता : सतेज पाटील  

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.