Sharad Pawar | पवारांचं ते कोणतं वाक्य होतं, ज्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं, आणि भाजपचा घात झाला, ऐका पवारांकडून

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाची तत्कालीन परिस्थिती तसेच त्यावेळचे डावपेच यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी माझ्या एका वाक्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढलं होतं असं सांगितलंय.

Sharad Pawar | पवारांचं ते कोणतं वाक्य होतं, ज्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं, आणि भाजपचा घात झाला, ऐका पवारांकडून
SHARAD PAWAR
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 1:24 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात कधीही शक्य नसलेलं सत्तासमिकरण अस्तित्वात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तिन्ही पक्ष सत्ताशकट मोठ्या कौशल्याने हाकत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाची तत्कालीन परिस्थिती तसेच त्यावेळचे डावपेच यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी माझ्या एका वाक्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढलं होतं असं सांगितलंय.

शरद पवार यांचं ते एक वाक्य कोणतं ?

लोकसत्ता वर्तमानपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाची परिस्थिती तसेच त्यावेळी काय घडामोडी घडल्या याबाबत सांगितलं. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून धडपड सुरु होती. तर दुसरीकडे शिवसेना मुख्यंत्रिपदावर अडून बसली होती. यावेळी सरकार स्थापन्यासाठी भाजपला बहुमताचा अकडा गाठण्यासाठी जिकरीचे होऊ लागले. याच गोष्टीचा फायदा घेत शरद पवार यांनी मोठा राजकीय डाव टाकला. याच राजकीय खेळीबद्दल त्यांनी भाष्य केलं. “देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची मदत हवी असेल तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करु, असे मी त्यावेळी म्हणालो होते. ते माझं एक वाक्य शिवसेना तसेच भाजपमध्ये अंतर वाढवण्यासाठी महत्त्वाचं ठरलं,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

असं अर्धवट काम सोडलं नसतं

याचबरोबर पवार यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी कार्यक्रमाबाबतही भाष्य केलं. मी अजित पवार यांना शपथेसाठी पाठवलं नव्हतं. मी पाठवलं असतं तर सरकार स्थापनच केलं असतं. असं अर्धवट काम सोडलं नसतं, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत शपथविधी घेतला होता. यामागे शरद पवार यांचा हात असल्याचं म्हटलं जातं. त्यांच्या वरील वक्तव्यानंतर आता शरद पवार यांची यामध्ये कोणतीही भूमिका नव्हती हे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान,  शरद पवार यांचा राकारणातील अनुभव पाहता ते या क्षेत्रातील चाणक्य आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितल्याप्रमाणे त्यांच्या एका वाक्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर वाढत गेले. त्यानंतर शिवसेनेची राष्ट्रवादी तसेच काँग्रेससोबत जवळीक वाढली. परिणामी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

इतर बातम्या :

Mumbai Section 144 | मुंबईकरांनो लक्ष द्या, शहरात आठ दिवसांची जमावबंदी, न्यू इयर पार्ट्यांनाही चाप

Akshay Kardile Wedding | भाजप नेते शिवाजी कर्डीलेंच्या घरी सनई चौघडे, मुलगा अक्षय कर्डीलेंचा शाही थाटात विवाह

फडणवीसांसोबत सरकार बनवण्यासाठी तुम्हीच अजित पवारांना पाठवलं होतं का? शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.