बारामतीचे ‘दादा’ कोण? शरद पवार यांचे दोन शब्दांत अजित पवार यांना उत्तर

sharad pawar on ajit pawar: राज ठाकरे यांनी शरद पवार जातीवादी असल्याचे वक्तव्य सोमवारी 'टीव्ही ९ मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यासाठी पुणेरी पगडी घालण्यास नकार दिल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, काहीही बोलणे हे राज ठाकरे यांचे वैशिष्ट्य आहे.

बारामतीचे 'दादा' कोण? शरद पवार यांचे दोन शब्दांत अजित पवार यांना उत्तर
शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 11:18 AM

बारामती विधानसभा मतदार संघात काका अजित पवार आणि पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत आहे. ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी पाहिली जात आहे. अजित पवार यांनी बारामती मतदार संघात विधासभेत आपणच दादा असणार असल्याचे म्हटले आहे. लोकसभेत आपला करेक्ट कार्यक्रम झाला आता विधानसभेत लोक आपल्यासोबत असतील, असे म्हटले होते. त्यावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी दोन शब्दांत उत्तर दिले. ‘बघू आता मतदान आहे.’ इतके बोलून त्यांनी विषय संपवला.

विरोधकांना त्रास देण्याचा उपक्रम

उद्वव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी सोमवारी वणी येथे करण्यात आली. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, सत्तेचा वापर कसा करायचा आणि विरोधकांना त्रास देणे हा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांचा आहे. त्यामुळे हे सहन करावा लागेल. परंतु त्याबद्दलची नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे. विरोधकांना अशा पद्धतीची वर्तणूक दिली जाते, हे लोकांसमोर येणे गरजेचे आहे. त्याचा काय निवडणूक फार मोठा परिणाम होईल, असे काही नाही, असे शरद पवार यांनी जळगावात माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

राज ठाकरेंबाबत पवार म्हणाले…

राज ठाकरे यांनी शरद पवार जातीवादी असल्याचे वक्तव्य सोमवारी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यासाठी पुणेरी पगडी घालण्यास नकार दिल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, काहीही बोलणे हे राज ठाकरे यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे एकमेव धोरण माझे आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपात कार्यकर्त्यांना अशी वागणूक

पुण्यात नरेंद्र मोदी यांची सभा आहे. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या सभा घेणे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु लोकसभेच्या वेळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्यापैकी 11 ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे. रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत दानवे कार्यकर्त्यास लाथ मारताना दिसत आहे. त्यावर शरद पवार यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, भाजपमध्ये सहकाऱ्यांना कसे वागवले जाते त्याच हे लक्षण आहे.

पांडुरंग शिंदे शरद पवारांच्या गटात

रयत क्रांती संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. जळगावमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका रुचली नाही, त्यामुळे शरद पवार गटात प्रवेश केल्याचं पांडुरंग शिंदे यांनी सांगितले. सदाभाऊ खोत यांच्या विषयीची नाराजी असल्यामुळे 25 जिल्ह्यातले कार्यकर्ते माझ्या संपर्कात असून ते सुद्धा लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील असा दावा पांडुरंग शिंदे यांनी केला आहे.

सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून लांब गेलेले असून त्यांचे काम व्यक्ती केंद्रित असल्याचे पांडुरंग शिंदे यांनी म्हटलं आहे. ऐन विधानसभेत रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.