मुंबईः शरद पवारांना जेलमध्ये गेलेल्या देशमुखांचे दुःख आहे. मात्र, ते काही आंदोलन करून आत गेले नाहीत. सामंजस्याची भूमिका घेणारे पवार आता फारच आक्रमक झाले आहेत. त्यांना विनंती आहे की, एसटी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा बदला त्यांनी घ्यावा, असे आवाहन शुक्रवारी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केले. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचा कृषी कायदा पंतप्रधानांनी आणला. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे कायदा प्रतिष्ठेचा न करता मागे घेतला. आता केंद्र सरकारने निर्णय घेतला. राज्य सरकारनेही एसटी कर्मचाऱ्यांचा निर्णय घ्यावा. अन्यथा करो या मारोची लढाई सुरू करू, असा इशारा त्यांनी दिला.
बाळासाहेबांच्या देशद्रोह्यांना काठ्या…
दरेकर म्हणाले की, सरकार आम्ही खासगीकरण करू, या भ्रमात असेल, तर ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. पोलिसांचा वापर करून बघितला. कर्मचारी कामावर पाठवण्याचा प्रयत्न केला, पण कर्मचारी कामावर जात नाहीत. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन आता शिवसैनिक कर्मचाऱ्यांवर लाठ्या घालत आहेत. बाळासाहेबांनी देशद्रोह्यांसाठी काठ्या, गोळ्या मारल्या. पण आता हे कर्मचाऱ्यावर चालून येत आहेत. आता जर लाठ्या काठ्या घेऊन आले, तर जशास तसे उत्तर द्या, असे आवाहन त्यांनी केले.
परबांचा अहंकार जात नाही..
दरेकर म्हणाले की, अनिल परबांचा अहंकार जात नाही. परब तुमचा कोणताही प्रयोग चालणार नाही. कोरोनावर लस काढली तसे एसटी आंदोलन शमवायचे असेल, तर विलीनीकरण एवढाच पर्याय आहे. नाशिकच्या गहिनीनाथ गायकवाड या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आतापर्यंत 40 मेले. एसटी कर्मचारी रोज आत्महत्या करत आहेत. पोलिसांनी लक्षात घ्यावे. उद्या यांनी हत्यार हातात घेतले, तर त्यांना दोषी ठेवू नका, असा इशारा त्यांनी दिला.
करो या मारोची लढाई लढा
आता करो या मारोची लढाई लढा. एकजुटीने आंदोलन लढा. सरकार तुमच्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन दरेकर यांनी केले. दरम्यान, सदाभाऊ खोत म्हणाले की, अशा पद्धतीने एसटी कर्मचारी कर्मचारी आत्महत्या करत असतील तर आम्ही का लढावे, असा सवाल त्यांनी केला. तुम्ही धीर सोडू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता आत्महत्या केली आहे. मात्र, आम्ही आंदोलन करतोय. तुम्ही आत्महत्या करू नका, अन्यथा आम्ही आंदोलन थांबवू, असे आवाहनही त्यांनी केले.
Special Report| ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा धगधगता अंगारमळा; संघर्ष, क्रौर्य आणि सत्तेची पोळी!https://t.co/NblnUtq1t2#agriculturallaws|#PrimeMinisterNarendraModi|#BJP|#Congress|#farmer|#farmerkillings|#farmersuicides
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2021
इतर बातम्याः
बळीराजाच्या रेट्यापुढे हुकूमशाही वृत्तीचे मोदी सरकार झुकले; नाना पटोलेंचा हल्लाबोल