Pawar On James Laine Controversy : तेही गलिच्छ, शरद पवारांनी जळगावमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा शिवजयंतीवरचा माफीनामा वाचून दाखवला

Pawar On James Laine Controversy : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) आणि जेम्स लेन (james laine) प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. जेम्स लेनने शिवचरित्रात अत्यंत गलिच्छ लेखन केलं आहे.

Pawar On James Laine Controversy : तेही गलिच्छ, शरद पवारांनी जळगावमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा शिवजयंतीवरचा माफीनामा वाचून दाखवला
95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उ्दघाटन हे खा. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 3:53 PM

जळगाव: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) आणि जेम्स लेन (james laine) प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. जेम्स लेनने शिवचरित्रात अत्यंत गलिच्छ लेखन केलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांना माहिती पुरवली. त्यानंतर पुरंदरे यांनी जेम्स लेन हा चांगला लेखक असल्याचं सांगून त्याचं कौतुकही केलं. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाल्याचं शरद पवार(sharad pawar) म्हणाले. पवार यांनी यावेळी जेम्स लेनच्या पुस्तकातील उताराच वाचून दाखवला. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवजयंतीचा घातलेला घोळ आणि त्यानंतर मागितलेली माफी याचे पुरावेही पवार यांनी सादर केले. पुरंदरे यांनी जयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार या मुद्द्यावर माफी मागितली आहे. त्यामुळे हा वाद वाढवला जाऊ नये, असं पवार म्हणाले. पवार आज जळगावात होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

जेम्स लेनने शिवाजी महाराजांवर काही लिहिलं. शहाजी राजे बाहेर होते. शिवछत्रपती आणि जिजामाता शिवनेरीवर राहत होते. दादोजी कोंडदेव त्या ठिकाणी कायम असत. महाराजांच्या वडिलांची उपस्थिती तिथे नव्हती. असं गलिच्छ लिखाण जेम्स लेनने केलं. त्याबाबत पुरंदेरेंनी सोलापूरला भाषण केलं. त्यात त्यांनी जेम्स लेनचं कौतुक केलं. जेम्स लेन हे चांगले शिवअभ्यासक आहे, असे उद्गार पुरंदरेंनी काढलं. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली. चीड निर्माण झाली, असं शरद पवार यांनी सांगितलं.

पुरंदरेंनी माफी मागितली

त्यानंतर पुरंदरे यांनी शिवजयंती कधी करावी असा प्रश्न उपस्थित केला. इंग्रजी कॅलेंडर आणि तिथी याबाबत त्यांनी विधान केलं. लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पुरंदरे यांनी पत्र दिलं. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार करावी असं मी सांगितलं. तसेच तिथीप्रमाणे जयंती साजरी करावी असा सल्ला मीच कालनिर्णयकारांना दिला, असं पुरंदरे यांनी या पत्रात म्हटलं आहे. कालनिर्णयकारांना मी दिलेल्या सल्ल्यामुळे शिवभक्ते संतापले. त्यांना त्रास झाला. त्यामुळे मी माफी मागतो, असं पुरंदरे यांनी पत्रात म्हटलं आहे, असं सांगत त्यामुळे आता हा वाद आपण वाढवू नये, असा सल्लाही पवारांनी दिला.

ते ट्विट एन्जॉय करतोय

फडणवीस यांनी एकावर एक ट्विट केले आहेत. हे ट्विट तुमच्या विरोधात आहे. असं पवारांना सांगण्यात आलं. त्यावर त्यांची प्रतिक्रियाही विचारली गेली. तेव्हा, फडणवीसांचे ट्विट मी एन्जॉय करतोय, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Sharad Pawar Live : महाराष्ट्र, बंगालमध्येच छापेमारी का? पवारांनी संपूर्ण कारण सविस्तर सांगितलं

Eknath Shinde | काहीही केलं तरी बाळासाहेबांनी जे केलंय, ते कुणी विसरणार नाही, औरंगाबादेत एकनाथ शिंदेंचं मनसेला उत्तर

Hasan Mushrif : मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून वाद चिघळला, कोल्हापुरात भाजपचा मोर्चा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.