लोकसभेच्या जागा कमी का लढवल्या, शरद पवार यांनी उघड केला भविष्यातील प्लॅन

sharad pawar press conference: सन 2019 मध्ये आमचे चार खासदार होते. परंतु आमचे लक्ष लोकसभा नाही तर विधानसभा आहे. लोकसभेसाठी कमी जागा घेऊन विधानसभेला अधिक जागा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

लोकसभेच्या जागा कमी का लढवल्या, शरद पवार यांनी उघड केला भविष्यातील प्लॅन
sharad pawar
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 9:08 AM

राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये प्रमुख लढत आहेत. या दोन्ही आघाडी आणि युतीमध्ये तीन-तीन पक्ष आहेत. महाविकास आघाडीत 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये ठाकरे यांच्या शिवसेनाला 22, काँग्रेसला 16 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या चर्चेला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी कमी जागा लढवण्यासंदर्भात आपली रणनीती सांगितली. शरद पवार यांनी आपले लक्ष्य लोकसभा नाही तर विधानसभा असल्याचे सांगितले.

काय म्हणाले शरद पवार

शरद पवार अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभेचा राष्ट्रवादी फक्त दहा जागांवर उमेदवार देत आहे, त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सन 2019 मध्ये आमचे चार खासदार होते. परंतु आमचे लक्ष लोकसभा नाही तर विधानसभा आहे. लोकसभेसाठी कमी जागा घेऊन विधानसभेला अधिक जागा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमार्फत जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे लोकसभेत आम्ही कमी जागा घेतल्याचे शरद पवार म्हणाले. ५० टक्केपक्षा जास्त जागांवर महविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दहा वर्ष तुमची सत्ता होती…

अजित पवार आणि भाजप नेते गेल्या दहा वर्षांत बारामतीचा विकास झाला नाही, अशी टीक करत आहेत. त्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, २०१४ ते २०२३ या दहा वर्षांत सत्तेचा अधिकार त्यांच्याकडे होता. त्यांनी या दहा वर्षांत काय केले, हे सांगितले पाहिजे. यावेळी शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनाही सोडले नाही. ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात सारखे फिरत असात…आता कोणत्या पक्षात आहेत, आता कोणत्या पक्षात आहे, असे मिश्किलपणे त्यांनी माध्यमांना विचारले.

हे सुद्धा वाचा

बारामती शरद पवार ज्या मैदानावर सभा घेतात, ते मैदान अजित पवार गटाने बुक केले आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, मैदान महत्वाचे विचार नाही, विचार महत्वाचा आहे. आम्ही मैदान बदलू किंवा सभेची तारीख बदलू.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.