जळगाव: मुंबई बॉम्बस्फोटाच्या (mumbai blast) मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केलेल्या आरोपाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट अनुमोदन दिलं. फडणवीस जे म्हणाले ते शंभर टक्के खरे आहे, असं शरद पवार (sharad pawar) म्हणाले. आणि त्यानंतर बॉम्बस्फोट घडल्यानंतरची परिस्थिती विशद करतानाच आपण ते विधान का केलं होतं? याची माहितीही दिली. तसेच या प्रकरणी नेमलेल्या आयोगाने मला समन्स बजावून माझी साक्ष नोंदवली होती. त्यावेळी मी आयोगा समोर जाऊन माझी बाजू मांडली. त्यानंतर आयोगानेही माझ्या भूमिकेचं समर्थन करत पवारांचा निर्णय सामाजाच्या हिताचा होता असं स्पष्ट केलं. आता जर कुणाला हे तारतम्य कळत नसेल. त्यानंतरही विधानं केली जात असतील तर त्यावर बोलणंच नको, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
शरद पवार यांनी आज जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी माझ्यावर एक आरोप केला. मुंबईतील बॉम्बस्फोट झाले. त्याची माहिती देत असताना मी 11 ऐवजी 12 बॉम्ब स्फोट झाल्याचं सांगितलं. तसंच मुस्लिम एरियाचंही नाव घेतलं. हे शंभर टक्के बरोबर आहे. कारण 11 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले ती हिंदुंची ठिकाणे होती. मी बॉम्बस्फोटाचा शोध घेतला. त्याचं मटेरियल मी पाहिलं. त्यापूर्वी मी देशाचा संरक्षण मंत्री होतो. बॉम्बस्फोटात काय मटेरियल वापरतात मला माहीत होतं. ते मटेरिलय पाहिल्यावर ते हिंदुस्थानात तयार होत नाही. कराचीत होतं. हे मला दिसून आलं. बाहेरचा देश हिंदू- मुस्लिमांमध्ये वाद वाढवण्याचं काम आणि आग लावण्याचं काम करत असल्याचं दिसून आलं. या स्फोटात स्थानिक मुस्लिम नव्हते. त्यामुळे मी 11 ऐवजी 12 बॉम्ब स्फोट झाल्याचं सांगितल्याने धार्मिक दंगल झाली नाही. त्यामुळे सर्व लोक एकत्र आले. सामाजिक ऐक्य टिकलं. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयोग नेमण्यात आला होता. त्यांनी मला समन्स बजावून बोलावून घेतलं. त्यावेळी त्यांना माझी भूमिका स्पष्ट केली. आयोगानेही पवारांचा निर्णय समाजाच्या हिताचा होता हे सांगितलं. हे तारतम्य कुणाला कळत नाही. त्यांनी काही विधानं केली असेल तर त्यावर बोलायला नको, असं पवार म्हणाले.
आपला पक्ष जातीयवादी नाही हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. मला काही समजत नाही. त्यांनी जातीवाद माझ्या नावावर का टाकलाय? कशामुळे टाकला माहीत नाही. राष्ट्रवादी स्थापन झाली. राष्ट्रवादी स्थापन झाला तेव्हा पहिलं नेतृत्व भुजबळ. नंतर मधुकर पिचड यांच्याकडे होतं. अरुण गुजराती. तटकरे हे सुद्धा आमचे अध्यक्ष होते. ही सर्व नावे समाजातील सर्व घटकांतील आहे. पक्षाची नीती ही एका जातीची नाही हे त्यातून दिसतं. त्यांना दुसरा काही रोजगार नाही. त्यामुळे ते असा आरोप करत आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला.
देशात दोन राज्यात केंद्राच्या एजन्सीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. त्याना काही करून सत्ता हातात हवी होती. त्यांना लोकांनी सत्ता दिली नाही. त्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे हस्तक्षेप कसा करता येईल या कामाला ते लागले आहेत. त्यामुळे छापेमारी होत आहे, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या: