वर्धापन दुसऱ्या पक्षाचा पण चर्चा शरद पवारांची, शरद पवार तब्बल 24 वर्षानंतर ‘त्या’ वास्तूला भेट देणार?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्या अशी विनंती कॉंग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पवार यांनी केली होती.
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सकाळपासून जोरदार चर्चा सुरू आहे. कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिन असल्याने त्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहे. खरंतर यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीती बद्दल काय विशेष असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण यामध्ये विशेष बाब म्हणजे शरद पवार हे तब्बल 24 वर्षानंतर पुण्यातील कॉँग्रेसभवन मध्ये येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच कॉंग्रेस भवनच्या प्रांगणात पाऊल ठेवणार आहे. शरद पवार यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी कधीही पुण्यातील कॉंग्रेस भवनात पाय ठेवला नव्हता, कॉंग्रेस भवनातील कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थिती लावली नव्हती. इतकंच कॉंग्रेस बरोबर युती असतांना शरद पवार कधीही कॉंग्रेस भवन येथे आले नाही. एकूणच शरद पवार यांनी कॉंग्रेस पक्ष सोडल्यानंतर कॉंग्रेस भवन येथे जाणे टाळले होते.
तब्बल 24 वर्षानंतर शरद पवार हे कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहून शुभेच्छा देणार आहे, यामध्ये कॉंग्रेस भवन येथे हा वर्धापन दिन साजरा होत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्या अशी विनंती कॉंग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पवार यांनी केली होती.
शरद पवार यांनी कुठलीही अडचण न सांगता कार्यक्रमाला येण्याचा शब्द दिला आहे त्यानुसार शरद पवार हे सायंकाळी कॉंग्रेस भवनात दाखल होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर म्हणजेच तब्बल 24 वर्षानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये येणार आहे.
एकूणच शरद पवार यांनी हे निमंत्रण स्विकारण्यामागील कारण काय आहे? शरद पवार इतक्या दिवस या कार्यालयात का आले नाही? किंवा त्यांनी कॉंग्रेस भवनात येणं का टाळलं असेल अशा विविध स्वरूपाच्या चर्चा होऊ लागल्या आहे.